Parliament Budget Session 2023 : भारतीय नारी... साडीत दिसते भारी; खासदारांचे लूक तुम्हीही करा Repeat

Parliament Budget Session 2023: सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या महिला खासदार संसद गाजवत आहेत. पण, संसजेबाहेरही त्यांचीच चर्चा सुरु आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे या महिला खासदारांच्या साड्या आणि त्यांचे लूक. 

Feb 08, 2023, 15:15 PM IST

Parliament Budget Session 2023 :  नोकरीच्या ठिकाणी जात असताना अनेक महिलांना साडी तर नेसायची असते, पण त्यातही साडी नेसत असताना भडकपणा टाळायचा असतो. मग करावं तरी काय? याचं उत्तर मिळतंय महिला खासदारांकडून. 

1/5

सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे खासदार जया बच्चन यांची. पांढऱ्या रंगाची लाल किनार असणारी सुरेख साडी जया बच्चन यांनी नेसली होती. सोबत अंगावर शालही घेतली होती. त्यांचा हा लूक कमालच होता. कॉर्पोरेट जॉब असो किंवा मग एखादी Meeting साडीची बातच और आहे असं म्हणायला हरकत नाही. 

2/5

खासदार नवनीत राणा या संसदेबाहेर रवी किशन यांच्यासमवेत दिसल्या यावेळी राणा यांच्या लूकनं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

3/5

समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीही संसदेत येतेवेळी गडद करड्या रंगाच्या आणि निळी किनार असणाऱ्या एका सूती साडीला पसंती दिली होती. सोबत त्यांनी एक मोठी हँडबॅगही कॅरी केली होती. 

4/5

जळजळीत वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महुआ मोईत्रा यांनीही त्यांच्या लूकनं नजरा वळवल्या. ओव्हरसाईज सनग्लासेस आणि पिवळ्या रंगाची साडी असा त्यांचा लूक कुणालाही शोभेल असाच होता. 

5/5

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या या लूकला बरीच पसंती मिळाली. इथं त्या इतर खासदारांसोबत वार्तालाभ करताना दिसल्या.