संपूर्ण भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हिमवृष्टी
तापमानात काही प्रमाणात गारवा
भारतात सध्या तापमानाचा पारा वाढत आहे. पण काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील वातावरण कोरड्या स्वरूपात राहिल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भारतात आता दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तर दक्षिणेस आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये पाऊस बरसत आहे. शिवाय मुरादाबादमध्ये हिमवृष्टी झाली आहे.