वीज बिल; नागरिकांच्या डोक्यावरून मोठं ओझं कमी

सरकारच्या योजनेचा नागरिकांना होणार फायदा 

Jun 24, 2020, 13:09 PM IST

वाढीव वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने नागरिकांच्या डोक्यावरून मोठं ओझं कमी केलं आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुर्बल घटकातील ग्राहकांना मोठी सवलत देण्याची घोषणा केली आहे.

1/5

सरकारची घोषणा

सरकारची घोषणा

चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही वीज ग्राहकांशी संवाद साधला. मार्च २०२० मधील असे वीज ग्राहक जे संबंधीत योजनेत सामाविष्ट आहेत. ज्यांना एप्रिल महिन्यात १०० रूपयांपर्यंत वीज बिल आलं आहे. तीन महिन्यापर्यंत १०० रूपयांपर्यंत वीज बिल आल्यास ५० रूपये बिल भरावं लागणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या या योजनेचा फायदा ३० लाख ६८ हजार लोकांना होणार आहे. 

2/5

लोकांना होणार फायदा

लोकांना होणार फायदा

मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की, ज्यांना एप्रिल महिन्यात १०० रूपये बिल आलं आहे परंतु मे, जून, जुलैमध्ये ज्यांना १०० ते ४०० रूपये दरम्यान वीज बिल आलं आहे. त्यांना फक्त १०० रूपये बिल भरावं लागणार आहे. या योजनेचा फायदा तब्बल ५६ लाख २५५ नागरिकांना होणार आहे. 

3/5

नागरिकांच्या डोक्यावरून मोठं ओझं कमी

नागरिकांच्या डोक्यावरून मोठं ओझं कमी

शिवाय ज्या ग्राहकांना मे, जून, जुलैमध्ये ४०० रूपयांपेक्षा जास्त बिल आहे. त्यांना आलेल्या बिलाच्या अर्धी रक्कम बिल म्हणून भरावी लागणार आहे. या योजनेचा फायदा १८३ नागरिकांना होणार आहे. 

4/5

२४ तास वीज

२४ तास वीज

मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, राज्यात कृषी कार्यासाठी सरकार १० तास आणि घरगुती ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करीत आहे.  

5/5

3 महिन्यांची सवलत

3 महिन्यांची सवलत

सरकारने तीन महिन्यांची सवलत दिल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.