घनदाट जंगल, जंगलात डोंगर, डोंगरात गुहा, गुहेत मंदिर आणि मंदिरात जिवंत नाग! महाराष्ट्रातील जागृत देवस्थान

कोकणातील हे जागृत देवस्था कुठे आहे? इथं जायचं कसं जाणून घेऊया.

Aug 09, 2024, 20:54 PM IST

Ratnagiri Marleshwar Temple : कोकण म्हणजे स्वर्ग... निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात एक जागृत देवस्थान आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हे ठिकाण आहे. घनदाट जंगल, जंगलात डोंगर, डोंगरात गुहा, गुहेत मंदिर आणि मंदिरात जिवंत नाग... इथं महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी नागाचे देखील दर्शन होते. 

1/7

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वरमध्ये निसर्गसौंदर्या आणि भक्तीचा अनोखा मिलाफ पहायला मिळतो. 

2/7

मार्लेश्वर हा 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा आहे. धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाची अंदाज अद्याप कोणालाही  आलेला नाही.

3/7

जागृत देवस्थान असलेले मार्लेश्वर हे धबधब्यामुळे देखील प्रसिद्ध आहे.  पावसाळ्यात मार्लेश्वरचा धबधबा रौद्ररुप धारण करतो.

4/7

मार्लेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या गर्भगृहात भक्तांना अनेकदा नागांचे देखील दर्शन होते.

5/7

घनदाद जंगलात असलेल्या एका डोंगरावरील गुहेत  मार्लेश्वरचे मंदिर आहे. 

6/7

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.  

7/7

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.