642 कोटींचं जॉब ऑफर लेटर... रोज प्रायव्हेट जेटने 1600 KM चा प्रवास करुन जाणार ऑफिसला कारण...
This CEO Will Fly 1600 KM To Office Daily: सध्या या प्रकरणाची जगभरामध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या कंपनीचे सीईओ हा एवढा मोठा प्रवास करुन इंधन वाया घालवणार आहेत तीच कंपनी लोकांना पर्यावरण संरक्षणासाठी काळजी घेण्याचं आवाहन करत पर्यावरणपूरक सेवा पुरवत असल्याचा दावा करते. त्यामुळेच ही कंपनी आता ट्रोल होत आहे. बरं या व्यक्तीसाठी आधीच्या कंपनीने त्याचं हेड ऑफिस शिफ्ट केलं होतं. जाणून घेऊयात नेमकी कोण आहे ही व्यक्ती आणि तिच्या या निर्णयासंदर्भात...
Swapnil Ghangale
| Aug 28, 2024, 12:43 PM IST
1/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785476-brianniccol1600km.jpg)
2/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785451-brianniccol2.jpg)
3/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785450-brianniccol4.jpg)
4/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785448-brianniccol6.jpg)
5/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785447-brianniccol3.jpg)
6/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785446-brianniccol5.jpg)
यापूर्वी ब्रायन निकोल हे 2018 साली चिपोटल नावाच्या फूड चैनचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष होते. या कंपनीचं हेड ऑफिस कोलोराडो येथील डेनव्हरमध्ये होतं. मात्र केवळ ब्रायन यांच्यासाठी कंपनीने आपलं मुख्य कार्यालय कॅलिफॉर्नियामध्ये स्थलांतरित केलं. अशाप्रकारे मोठ्या हुद्द्यावरील लोकांनी विचित्र अटी समोर ठेवणं ही अमेरिकेमध्ये सामान्य बाब आहे.
7/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785445-brianniccol8.jpg)
मात्र ब्रायन निकोल यांच्या या विचित्र अटीमुळे आता स्टारबर्क्स कंपनीवर टीका होताना दिसत आहे. एकीकडे कार्बन फूटप्रिंट म्हणजेच निसर्गाला होणारी हनी कमी करण्यासाठी कंपनी प्लास्टीकऐवजी कागदाच्या नळ्या ग्राहकांना देते आणि दुसरीकडे त्यांचे सीईओ अशाप्रकारे त्यांच्या हट्टापायी रोज हजारो लीटरचं इंधन जाळणार आहेत, हा विरोधाभास असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.
8/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785444-brianniccol9.jpg)
9/9
![brianniccol1600km](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/28/785443-brianniccol1.jpg)