'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो
Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?
या जगामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमीच आपल्या पाहण्यात किंवा वाचण्यात येत असतात. पण एका रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण जपान या देशामध्ये असलेल्या या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुमच्या जेवणाची ऑर्डर माकडे घेताना दिसत आहे.

एका रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण जपान या देशामध्ये असलेल्या या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या जेवणाची ऑर्डर घेण्याकरिता कोणी मनुष्य नव्हे तर चक्क एक माकड येते आणि तुमच्या जेवणाची ऑर्डर नोंदवून घेतात. त्याबदल्यात त्यांना पगारही दिला जातो.

जपानचे कायाबुकिया रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. वियर्ड रेस्टॉरंटच्या यादीत या रेस्टॉरंटचा समावेश करण्यात आला आहे. येथे दोन माकडांना वेटर म्हणून काम देण्यात आले आहे. ही माकडे रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करतात. या माकडांना पाहण्यासाठी अनेक लोक लांबून येतात. अनेकजण त्यांना दिलेले जेवण खायला येतात असे म्हणावे लागेल.


