Volvo ची सर्वात पावरफुल SUV कार लाँच; 530Km ड्रायव्हिंग रेंज आणि 27 मिनिटांत फुल चार्ज होणार

भारतीय बाजारपेठेत Volvo C40 Recharge रही नवी कार लाँच झाली आहे. जाणून घेवूया फिचर्स आणि किंमत. 

वनिता कांबळे | Sep 05, 2023, 16:58 PM IST

Volvo C40 Recharge:  स्वीडनमधील सर्वात नामांकित ऑटोमोबाईल कंपनी  Volvo ने आपली सर्वात पावरफुल SUV कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कार फक्त 27 मिनिटांत फुल चार्ज होणार होते. ही कार  530Km ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. 

1/7

लक्झरी वाहनांच्या निर्मीतीसाठी Volvo कंपनी प्रसिद्ध आहे.  Volvo कंपनीने आपली नवी अलिशान कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. 

2/7

 या कारची स्टार्टिंग प्राईज  61.25 लाख इतकी आहे.  कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरमार्फत ही कार बुक करता येईल. 

3/7

ब्लॅक स्टोन, फ्यूजन रेड, थंडर ग्रे, फजॉर्ड ब्लू, सिल्व्हर डाउन आणि क्रिस्टल व्हाइट, सेज ग्रीन आणि ऑनिक्स ब्लॅक अशा 8 कलर ऑप्शनमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारचा टॉप स्पीड  180 Km इतका आहे. 

4/7

Volvo C40 Recharge कार 27 मिनिटांत फुल चार्ज होते असाही कंपनीचा दावा आहे. 

5/7

एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 530Km ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.   

6/7

Volvo C40 Recharge या कारचा लुक एकदम स्पोर्टी लुक आहे.

7/7

Volvo कंपनीने XC40 रिचार्ज ही पहिली कार लाँच केली होती. ही पेट्रोल कार आहे. यानंतर आता कंपनीने आता Volvo C40 ही आपली दुसरी कार भारतीय बाजारपेठेत उतरवली आहे.