राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपलनं का नाही दिला घटस्फोट? अभिनेता म्हणाला होता, 'कारण तिला माझी बायको...'

Rajesh Khanna Death Anniversary : राजेश खन्ना यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपल कपाडिया यांनी घटस्फोट का दिला नव्हता. 

| Jul 18, 2024, 10:12 AM IST
1/9

 राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे त्यांच्या काळातील हिट जोडप्यांपैकी एक होते. दोघांमध्ये 16 वर्षांच अंतर असूनही त्यांनी लग्न केलं. डिंपलचा ब्लॉकबस्टर पहिला चित्रपट बॉबीही रिलीज झाला नाही तेव्हा त्यांनी लग्न केलं. पण लग्नानंतर नात्यात तणाव आला आणि हे जोडपे वेगळे झाले पण त्यांनी घटस्फोट कधी घेतला नाही. 

2/9

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना हे 1982 मध्ये ते वेगळे झाले. विशेष म्हणजे विभक्त होऊनही या जोडप्याने कधीही अधिकृतपणे घटस्फोट घेतला नाही. मागील कारणही राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

3/9

 अभिनेत्याने वर्षापूर्वी एका मुलाखतीत रिपोर्टरने राजेश खन्ना यांना डिंपलसोबतच्या त्याच्या गुंतागुंतीच्या लग्नाबद्दल आणि डिंपल यांच्याकडे परत येणार का? असं विचारल होतं. ज्यावर अभिनेता म्हणाला, 'म्हणजे पुन्हा?' ते आधी कुठे वेगळे होते? 

4/9

राजेश खन्ना पुढे म्हणाले की, तिने अद्याप घटस्फोट दिलेला नाही, ती अजिबात देत नाही, मला माहित नाही की ती का देत नाही, मला माहित नाही का? ती इथे व्हँकुव्हरला आल्यावर तिला जरूर विचारा. ती तुम्हाला योग्य उत्तर देईल. मी एवढंच म्हणेन की घटस्फोट झाला नसेल तर दिला नाही आणि तिची इच्छा आहे आणि कदाचित तिला माझी बायकोच राहयच असेल. 

5/9

लग्नाच्या 9 वर्षानंतर डिंपल तिच्या दोन मुलींसह 1982 मध्ये राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाली. त्यानंतर तिने पुन्हा एकदा चित्रपटाची वाट धरली. 

6/9

असं म्हटलं जातं की, राजेश खन्ना यांनी लग्नानंतर डिंपलला अभिनय करण्यास बंदी घातली होती आणि या लग्नाबद्दल बोलताना डिंपल म्हणाली होती की, 'लग्नाच्या सुमारे 7 दिवस आधी मी त्यांना भेटले होते आणि आम्ही एकाच चार्टर्ड फ्लाइटने शोसाठी अहमदाबादला जात होतो. तो पूर्ण वेळ माझ्या शेजारी बसला पण एक शब्दही बोलला नाही.'

7/9

डिंपल यांनी सांगितले की 'आम्ही खाली उतरू लागताच तो माझ्याकडे वळला, माझ्या डोळ्यात बघितल आणि म्हणाला की मला तुझ्याशी लग्न करायच आहे.' त्या म्हणाल्यात की, 'ज्या दिवशी राजेश आणि माझं लग्न झालं, त्या दिवशी आमच्या घरातला आनंद संपला.'

8/9

त्यांच्या नात्याला 'तमाशा' म्हणण्याआधी त्या म्हणाल्यात की, 'माझ्या करिअरमध्ये बॉबीचे महत्त्व समजण्यासाठी मी खूप लहान होते, पण ज्या दिवशी मी राजेशच्या घरी आशीर्वादला प्रवेश केला, तेव्हापासून मला माहित होते की हे लग्न टिकणार नाही'

9/9

दरम्यान राजेश खन्ना यांचं 18 जुलै 2012 ला कर्करोगाने निधन झालं, तेव्हापासून डिंपल आपल्या मुली ट्विंकल आणि रिंकी खन्नासोबत आपलं आयुष्य जगत आहे.