Glenn Maxwell: हैदराबादविरूद्ध का खेळला नाही मॅक्सवेल? अखेर खरं कारण आलं समोर

Glenn Maxwell: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीला पराभवाची चव चाखावी लागली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार प्लेअर ग्लेन मॅक्सवेला प्लेईंग 11 मध्ये संधी न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Surabhi Jagdish | Apr 16, 2024, 07:50 AM IST
1/7

सामन्यापूर्वी जेव्हा प्लेईंग इलेव्हन समोर आली तेव्हा ग्लेन मॅक्सवेल या सामन्यातून बाहेर असल्याची माहिती मिळाली. 

2/7

ग्लेन मॅक्सवेल SRH विरुद्धच्या सामन्यात का समावेश केला गेला नाही, याचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

3/7

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ग्लेन मॅक्सवेलच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. 

4/7

त्यामुळे मॅक्सवेलने त्या सामन्याच्या मध्यातच मैदान सोडले होतं. 

5/7

आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर मो बॉबट यांनी मॅक्सवेलच्या दुखापतीबाबत माहिती देत सांगितलं की, तपासानुसार मॅक्सवेलची दुखापत ही गंभीर बाब नाहीये आणि तो लवकरच बरा होईल. 

6/7

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सांगितलं की, मॅक्सवेल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

7/7

दुसरीकडे, यंदाच्या सिझनमध्ये मॅक्सवेलचा फॉर्मदेखील उत्तम नाहीये. त्यामुळे त्याला बाहेर ठेवलं असल्याची चर्चा आहे.