PHOTOS : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात, स्वर्गातून प्रवास करण्याचा अद्भूत अनुभव

World Highest Chenab rail bridge : ढगातून आपण विमानातून आपण प्रवास केलाय. आता रेल्वेतूनही तुम्ही स्वर्गातून प्रवास करणाच्या अद्भूत अनुभव घेणार आहोत. कारण जगातील सर्वात उंच रेल्वे जो भारतात आहे, तो प्रवासासाठी सज्ज झालाय. 

| Jan 06, 2025, 20:28 PM IST
1/10

हिमालय आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर पहिल्यांदाच ट्रेन धावणार असून संपूर्ण देश आता काश्मीरशी जोडला जाणार आहे. गेल्या शनिवारी कटरा बनिहाल रेल्वे विभागात प्रथमच ट्रेनची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून दिल्ली ते श्रीनगर म्हणजेच काश्मीरपर्यंत रेल्वेने प्रवास करता येणार आहे. 

2/10

काश्मीरला जोडणारा चिनाब पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे. या पुलावरून गाड्या गेल्यावर ढगांमधून जात असल्याचा भास होतो. जम्मू-काश्मीरमध्ये बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून प्रवास करण्याचा थरार स्वतःच अप्रतिम असेल.  

3/10

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज काश्मीरला उर्वरित भारताशी जोडेल. 

4/10

भारतीय रेल्वेच्या इतिहासात काश्मीर खोरे रेल्वेने जोडण्याची ही पहिलीच वेळ असेल. चिनाब ब्रिज हे इंजिनीअरिंगचे अप्रतिम उदाहरण असेल, पण तो बांधणेही तितकेच अवघड होते. 

5/10

चिनाब नदीवर बांधलेला हा रेल्वे पूल पूर्ण होण्यासाठी सुमारे 22 वर्षे लागलीय. रेल्वेने 2003 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली होती आणि 2025 मध्ये तो पूर्णपणे प्रवासासाठी सज्ज झालाय. जम्मू ते काश्मीर या 271 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर बांधलेला हा पूल 1315 मीटर लांब आहे.

6/10

हा पूल स्ट्रक्चरल स्टीलचा बनलेला आहे, ज्यामुळे तो उणे 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करु शकणार आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणत्याही मोसमात सहज प्रवास करता येणार आहे. 

7/10

हा पूल 17 खांबांवर उभा असून बांधकामाच्या वेळी 266 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते, ज्यामुळे पुलाच्या बांधकामात वारंवार अडथळा येत होता. 25000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करून बनवलेला पूल वादळ सहन करण्यास सक्षम आहे. 

8/10

या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या ब्लास्ट लोड डिझाइनवर तो निर्माण करण्यात आला. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करणार आहे. हा पूल पुढील 120 वर्षांसाठी सज्ज असणार आहे, असा दावा करण्यात आलाय. हा पूल ताशी 220 किमी वेगाने जाणाऱ्या वादळालाही तोंड देण्यास सक्षम आहे. शक्तिशाली बॉम्बस्फोटही या पुलाचे नुकसान होणार नाही. एखादा खांब जरी तुटला तरी कोणतीही हानी न होता या पुलावरून ट्रेन सुरळीतपणे प्रवास करु शकणार आहे, अशी याची निर्मिती करण्यात आलीय. 

9/10

हा पूल 35,000 कोटी रुपयांच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा एक भाग असून तो बांधण्यासाठी सरकारला 14,000 कोटी रुपये खर्च आलाय. 

10/10

या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर काश्मीरमधील जनतेला मोठा फायदा होणार असं तज्ज्ञ सांगतात. काश्मीरमधील लोक रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या इतर भागांशी संपर्क साधू शकणार आहेत. काश्मीरमधील शेतकरी कोणत्याही हंगामात काही तासांत त्यांची पिके देशाच्या इतर भागात यापुढे सहज पोहू शकणार आहेत. यामुळे व्यापार वाढेल आणि उत्पन्न वाढण्यासही महत मिळेल.