Budh And Mangal Grah Impact: नववर्ष 2023 मध्ये पहिला हिंदू सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाईल. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी या दिवशी येत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. पण या गोचरापूर्वी दोन मोठे ग्रह उलथापालथ करणार आहे. 13 जानेवारीला मंगळ वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. अस्ताला गेलेला बुध ग्रह धनु राशीत उदीत होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ ग्रह रात्री 12 वाजून 7 मिनिटांनी वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. तर बुध ग्रहाचा सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी धनु राशीत उदय होणार आहे. या दोन ग्रहांची स्थितीमुळे मेष, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. यामुळे काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल. यामध्ये चार राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.
मेष- मकर संक्रांतीपूर्वी मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. काम करताना उत्साह दिसून येईल. आध्यात्मिक कार्यात मोठ्या भक्तिभावाने भाग घ्याल. मित्रमंडळी आणि कुटुंबाची साथ मिळेल. आईच्या बाजूने धनप्राप्तीचा योग आहे. नोकरीत मोठी संधी मिळण्याची शक्यता असून भरघोस पगार मिळू शकतो.
मिथुन- दोन्ही ग्रहांची स्थिती या मिथुन राशीच्या लोकांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पडेल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरी शोधात असलेल्यांना काही ऑफर मिळतील. आर्थिक अडचणीतून सुटका होईल. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असेल.
बातमी वाचा- Durva: गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे प्रभावी तोडगे, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या
कर्क- या राशीच्या लोकांनी अशा ग्रहमानामुळे दिलासा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून संकटाचा पाऊस सुरु असताना दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. कुटुंबीय आणि मित्रांची या काळात उत्तम साथ मिळेल. त्यामुळे अडचणीची कामं मार्गी लागतील.
तूळ- ग्रहामानामुळे आत्मविश्वास वाढेल तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची रुची वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. भावाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. जोडीदाराकडून साथ मिळेल त्यामुळे किचकट कामं चुटकीसरशी पूर्ण होतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)