मेष - काही कामात अडथळे येऊ शकतात. मेहनत घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. विचार करून निर्णय घ्या. कामात घाई करू नका, नुकसान होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. पैसे तसेच गुंतवणूकीबाबत एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवन सुखकारक राहील.
वृषभ - व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदारवर्गाची बढती होऊ शकते. एकत्र काम करण्यांची मदत मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. अविवाहित लोकांचे प्रेमसंबंध चांगले राहतील. कामात झालेले बदल फायदेशीर ठरतील. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील.
मिथुन - ग्रहांची स्थिती उत्तम आहे. सक्रिय राहाल. ऑफिसमध्ये नवीन काम किंवा जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराची मदत मिळू शकते. नवीन लोकांशी ओळखी होतील. उत्साही वाटेल. तब्येतीत सुधारणा होईल.
कर्क - ऑफिसमध्ये काही लोकांना प्रभावित करू शकाल. अधिक गुंतवणूकीचा विचार करू शकतात. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात सुख-समाधान राहील. सांभाळून राहा.
सिंह - व्यवसायात सावध राहा. ऑफिसमध्ये हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करू नका. एखाद्या कार्यक्रमाची योजना बनू शकते.
कन्या - व्यवसाय, नोकरीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढवण्याकडे आणि खर्च कमी करण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. तब्येतीत सुधारणा होईल.
तुळ - रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात वेळेत मदत न मिळाल्याने अडचणी येऊ शकतात. काही लोक तुमच्या कामासाठी विरोध करतील. काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची मदत मिळेल.
वृश्चिक - व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. जुन्या समस्या सोडवल्या जातील. जबाबदारी पूर्ण करू शकता. चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिक निर्णय विचार करून घ्या. प्रवास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.
धनु - नोकरदारवर्गातील लोकांच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. वायफळ कामात वेळ वाया जाईल. कामासाठी बाहेर जावे लागू शकते. प्रेमसंबंधांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.
मकर - जुन्या समस्या संपण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरी, व्यवसायात काही नवीन कल्पना येतील. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
कुंभ - दिवस चांगला जाईल. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत मिळेल. काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांचा सल्ला मिळू शकतो. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते.
मीन - अचानक फायदा होण्याचा योग आहे. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. सावधतेने विचार करून बोला. तब्येतीची काळजी घ्या.