Good Morning Tips : हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे. शास्त्रानुसार गाय पवित्र असून तिला कामधेनूचं रूप मानलं जातं. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की, समुद्र मंथनामध्ये अमृत कलशासह इतर 14 रत्ने सापडली होती. त्यापैकी एक कामधेनू गाय होती. त्यामुळे हिंदू धर्मात गायी ही पूजनीय आहे. त्यामुळे अनेक मंदिराच्या बाहेर गाय घेऊन व्यक्ती बसलेले असतात. हिंदू धर्मात असं मानलं जातं की गाईमध्ये देव वास असतो. म्हणून सुख समृद्धीसह प्रगतीसाठी गायीची पूजा केली पाहिजे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, जर तुम्ही रोज सकाळी उठून गाईशी संबंधित उपाय केले तर यश तुमच्या दारावर येईल. (Good Morning Tips cow feeding benefits in astrology Do daily cow related remedies for progress and prosperity money in marathi)
गाय आणि गाईशी संबंधित सर्व गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. दूध असो, गोमूत्र असो, शेण असो, सर्व गोष्टी अत्यंत पवित्र असतात. या सगळ्याचा पूजा हवनातदेखील समावेश केला जातो. असं म्हणतात की, गायीमध्ये 33 कोटी देवता वास असतो.
1. सकाळी पहिली चपाती, पोळी किंवा भाकर ही गायीला खाऊ घाला, असं केल्याने पुण्य मिळतं.
2. रोज सकाळी आंघोळीनंतर गाईची पूजा करा. असं केल्याने तुम्हाला सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या घरात पैसे आणि धान्याची कमरता जाणवणार नाही.
3. गाईची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर संपत्तीचा आशिर्वाद देते.
4. शास्त्रानुसार गाईला नियमित चारा द्याला हवा.
5. जर तुम्हाला कुठल्या समस्येचा त्रास होतं असले तर बुधवारी गायीला हिरवा चारा किंवा पालक किंवा हिरव्या भाज्या खाऊ घाला.
6. गाईच्या पाठीवरून हात फिरवल्यास तुम्हाला झालेल्या रोगांचा नाश होतो आणि तुमचं आरोग्यही मजबूत होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)