Holika Dahan 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये होळीचा उत्साह सुरु झाला असून महाराष्ट्रातील कोकणात हा उत्साह 15 दिवस असतो. या होळीच्या उत्साहाला कोकणात शिमगा असं म्हटलं जातं. अच्छा ही होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असतो. तुम्हाला भक्त प्रल्हादाची आख्यायिका माहिती असेल. आपण ती लहानपणापासून ऐकली आहे. पुन्हा एकदा आम्ही ही कथा सांगतो. गर्भात असताना असुर हिरण्यकशिपू यांच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला. लहानपणापासूनच प्रहाल्द विष्णूचा भक्त होता. खूप प्रयत्नानंतरही हिरण्यकशिपू प्रल्हादाची विष्णू भक्ती संपवू शकला नाही. त्यामुळे त्याने मुलगा प्रल्हादाला हत्येचा आदेश दिला. अनेक प्रयत्नानंतरही प्रल्हादाचा केसांना धक्का लागला नाही. त्यानंतर हिरण्यकशिपूची बहीण होलिका हिला प्रल्हाद घेऊन अग्नीत बसायला सांगितलं. पण विष्णू यांनी प्रल्हादाचा जीव वाचविला आणि होलिकाचं दहन झालं. तेव्हापासून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. (Holi 2024 Do you know where is the temple of Holika lover A wedding procession takes place here every year)
पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा होलिकाचं दहन झालं तेव्हा तिचं लग्न ठरलं होतं. तिच्या मृत्यूनंतर होलिकाच्या होणाऱ्या नवऱ्याच काय झालं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. होलिकाच्या प्रियकराच मंदिर हे रायपूरला असून त्याने होलिकेच्या मृत्यूनंतर लग्न केलं नाही. हे रायपूरमधील मंदिर फक्त फाल्गुन महिन्यातच उघडतं. याचा अर्थ या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद ठेवले जातात. या मंदिराची अजून एक परंपरा आहे, जी आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते. आख्यायिकानुसार धर्मशास्त्रात असं म्हटलं जातं की, ज्यांना जोडप्याला मूल होत नाही, त्यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास फायदा होतो असं म्हणतात.
रायपूरमधील होलिकेचा होणाऱ्या नवरा नथुरामाच मंदिर खूप प्रसिद्ध आहे. होलिका दहनाच्या तीन चार दिवसांआधी या मंदिराचे दरवाजे उघडतात. त्यानंतर इथे अनेक प्रकारचे विधी होता. या मंदिरात रोज रात्री मेळावा भरतो, ज्यामध्ये असंख्य लोक सहभागी होतात.
यानंतर, नथुरामची लग्न मिरवणूकदेखील काढण्यात येते. या मिरवणुकीत भक्त पारंपारिक नृत्य आणि गाणी गातात. होलिकाला ब्रह्मदेवाने दिलेले वरदान होलिकासाठी घातक ठरलं. वरदान असून होलिकाचे अग्नीत भस्म होऊन राख झाली. त्यामुळे होलिकाशी लग्न करण्याची नथुरामची इच्छा अपूर्णच राहिली. त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी फाल्गुन महिन्यात विवाह मिरवणूक काढतात. या ठिकाणी राजस्थानमधील मारवाड भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थितीत राहतात. या मिरवणुकीत भक्तांना शिरापुराचा प्रसाद दिला जातो. या मिरवणुकीला 187 वर्षांची जुनी परंपरा आहे.
नथुरामावर भक्तांचा खूप विश्वास असून कोणी भगवान शंकर तर कोणी थोर संत म्हणून उपासना आजही करताना दिसतात. तर नथुरामाचं या मंदिराला 4 वर्षांनी 200 वर्षे पूर्ण होणार आहेत. धार्मिक आख्यायिकेतून नात्याचे अनेक पैलू आपल्याला शिकवले जातात. प्रेम, विश्वास आणि निष्ठा हे या नथुरामाच्या गोष्टीतून शिकायला मिळते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)