मेष - व्यवसायात फायदा कमी होईल. कोणतंही नवीन काम सुरु करताना सावध राहा. दिवस काहीसा तणावाचा ठरु शकतो. मनात अनेक विचार सुरु राहतील. कामं पूर्ण न झाल्याने मूड खराब राहू शकतो.
वृषभ - रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कौंटुंबिक संबंध चांगले राहतील. तुमची प्रतिमा उंचावण्याची संधी मिळू शकते. विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तब्येत चांगली राहील. उत्साही राहाल.
मिथुन - कामात व्यस्त राहाल. मेहनत करावी लागेल. अनेक दिवसांपासून राहिलेली कामं पूर्ण करु शकता. दिवस चांगला आहे. सक्रीय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात.
कर्क - घाईत कोणतंही काम करु नका. खर्च वाढू शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका.
सिंह - वाद होण्याची शक्यता आहे. अधिक विचार करण्यात वेळ घालवू नका. कामात अडथळे आल्याने मूड बिघडू शकतो. व्यस्त राहाल. तब्येतीत चढ-उतार राहतील. अपेक्षित लोकांकडून मदत मिळणार नाही.
कन्या - कुटुंबात सुख-शांती राहील. जोडीदाराची साथ मिळेल. उत्साही, आनंदी राहाल. सकारात्मक विचार करा. अनेक गोष्टींचा अति विचार करु नका. कामात वेळ जाईल. तब्येत चांगली राहील.
तुळ - दररोजच्या कामातून काही वेळ मिळू शकतो. अधिकतर समस्या संपुष्टात येतील. राहिलेली कामं पूर्ण करता येतील. मोठ्यांचं सहकार्य मिळेल. दिवस तणावाचा ठरु शकतो. आराम करा, अन्यथा तब्येतीच्या समस्या उद्भवू शकतात. चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक - नोकरी, व्यवसायात लाभ होऊ शकतो. दिवस चांगला आहे. अधिक लाभासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल. फायद्याचा विचार करा. इतरांना नाराज न करता कामं पूर्ण करा. इतरांच्या भावनांच्या विचार करुन बोला.
धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुन मगच निर्णय घ्या. चांगल्या संधी मिळू शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवाल. तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात आनंद, उत्साही वातावरण राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर - पैशांच्या बाबतीत सावध राहा. दिवसाची सुरुवात तणावपूर्ण ठरु शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या योजना गुप्त ठेवा. वाद होऊ शकतात. डोकेदुखी, पोटदुखी उद्भवू शकते. काळजी घ्या.
कुंभ - आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. कामात वेळ जाईल. चांगले विचार करा. खर्च आणि इनकम यांचा ताळमेळ ठेवा. चांगली बातमी मिळू शकते. प्रयत्न केल्यास समस्या सोडवू शकता.
मीन - काम करताना सावध राहा. जे जसं चालू आहे तसं सुरु ठेवा. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना विचार करुन पुढे जा. सावधानता बाळगा. पैसे खर्च करताना लक्ष द्या. तब्येत चांगली राहील.