Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या

 Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

Updated: Nov 5, 2022, 07:00 AM IST
Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या title=

Astro News : अनेकजण हातात लाल रंगाचा धागा बांधतात. कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यात कलावा किंवा लाल धागा बांधण्याची प्रथा आहे. हिंदू मान्यतेनुसार लाल धागा शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार लाल धागा हातात बांधण्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. पण कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा घालू नये हे देखील सांगण्यात आले आहे. 

काय आहेत फायदे? 

हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि जय हतुमानाची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह अधिक मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार लाल धागा बांधल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि त्याचा जीवनावर चांगला प्रभाव पडतो. 

लाल धागा कोणी घालू नये?

ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की, कोणत्या लोकांनी लाल धागा हातात बांधू नये. असे मानले जाते की, शनिदेवाला लाल धागा आवडत नाही. यासाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. शनी महाराज हे कुंभ आणि मीन राशीचे स्वामी आहेत. अशा स्थितीत या दोन्ही राशींच्या लोकांनी हातात कलावा किंवा लाल रंगाचा धागा बांधू नये. या लोकांनी हातात निळा धागा बांधावा. 

लाल धागा कोणी हातात बांधावा?

वृश्चिक, सिंह आणि मेष राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा कलावा बांधावा. या राशीच्या लोकांना लाल धागा बांधल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळत नाही. तुमच्यावर त्याची कृपा होत नाही.

वैज्ञानिक कारणे काय आहेत?

मनगटात लाल धागा बांधण्यामागे शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)