Chandra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलत असतात. एका ठराविक वेळेनंतर हे ग्रह 12 राशीत भ्रमण करत असतात. शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळासाठी एका राशीत असतो. त्यानंतर तो दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. शास्त्रानुसार न्यायदेवात सर्वात संथ गतीने म्हणजे साधारण अडीच वर्षांनी एका राशीत सहवासात राहतो. शनीदेव सध्या कुंभ राशीत असून तो आज नक्षत्र बदल करणार आहे. तर सर्वात संथ जलद गतीने चंद्रदेव म्हणजे सव्वा दिवसात तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. चंद्र आज तूळ राशीत असून तिथे मंगळ आणि केतु ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे अशा स्थिती अंगारक योग निर्माण झाला आहे. तर त्यात चंद्राच्या उपस्थितीमुळे ग्रहण योगाची निर्मीती झाली आहे. तरदुसरीकडे आपण मंगळ आणि चंद्राबद्दल बोललो तर लक्ष्मी योगाची निर्माण झाला आहे. या योगांमुळे पुढील अडीच दिवस काही राशींसाठी ग्रहणासारखे असणार आहे. (moon made Grahan Yog Angarak Yog and Laxmi Yoga auspicious inauspicious yoga Crisis will come to these zodiac signs people chandra gochar)
चंद्र गोचर हा तूळ राशीच्या लोकांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरणार आहे. पुढील अडीच दिवस या राशीच्या लोकांसाठी कठीण असणार आहे. या लोकांना मानसिक त्रासासोबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
चंद्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना ग्रहण आणि अंगारक योगाचा जबरदस्त फटका बसणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. पण लक्ष्मी योगामुळे ते यातून काही बाहेर पडू शकणार आहे.
चंद्र गोचर या राशीच्या लोकांसाठी कठीण दिवस घेऊन आला आहे. ग्रहण योग आणि अंगारक योगामुळे कुटुंबात समस्यांसोबत वादविवाद भांडणे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्र गोचरमुळे मीन राशीच्या लोकांना त्रासदायक ठरणार आहे. या लोकांना आधीच शनि साडेसातीचा पहिला टप्पा सहन करावा लागतोय. त्यात चंद्र गोचरमुळे पुढील सव्वा दोन दिवस अधिक कष्टाचे ठरणार आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)