Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात दुसऱ्या मोठा सण म्हणजे शारदीय नवरात्री. देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा नवरात्रीत केली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात (Navratri 2023 Start Date) होते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्र सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 15 ऑक्टोबर 2023 (Navratri 2023 Date) पासून सुरु होणार आहे. (Navratri 2023 ghatasthapana Navratri Shubh Muhurat durga pujan vidhi video )
रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे. 24 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा (Dasara 2023 Date) हा सण साजरा करण्यात येणार आहे.
प्रतिपदा तिथी आरंभ – 14 सप्टेंबर 2023, शनिवारी, रात्री 11:24 वाजता
प्रतिपदा तिथी समाप्ती- 15 ऑक्टोबर, रविवारी, दुपारी 12:32 वाजता
घट स्थापना तारीख : 15 ऑक्टोबर 2023, रविवार
घटस्थापना मुहूर्त: 15 ऑक्टोबरला सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत
15 ऑक्टोबर 2023 - प्रतिपदा तिथी - देवी शैलपुत्री
16 ऑक्टोबर 2023 - द्वितीया तिथी - देवी ब्रह्मचारिणी
17 ऑक्टोबर 2023 - तृतीया तिथी - देवी चंद्रघंटा
18 ऑक्टोबर 2023 - चतुर्थी तिथी - देवी कुष्मांडा
19 ऑक्टोबर 2023 - पंचमी तिथी- देवी स्कंदमाता
20 ऑक्टोबर 2023 - षष्ठी तिथी - देवी कात्यायनी
21 ऑक्टोबर 2023 - सप्तमी तिथी- देवी कालरात्री
22 ऑक्टोबर 2023 - दुर्गा अष्टमी- देवी महागौरी
23 ऑक्टोबर 2023 - महानवमी- शारदीय नवरात्रीचा उपवास.
24 ऑक्टोबर 2023 - दशमी तिथी - देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन
1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा.
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)