Palmistry For Money: हस्तसामुद्रिक ही भविष्य वर्तवण्याच्या पद्धतीमधील एक लोकप्रिय पद्धत आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्रात (Palmistry) हातावरील रेषा, उंचवटे आणि चिन्हांवरून भाकीत वर्तवलं जातं. हस्तरेषांवरही नवग्रहांचा प्रभाव असतो. हाताचा आकार, लवचिकपणा, बोटं, अंगठा, शुक्रकंकण, शनिकंकण, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा, रविरेषा, बुधरेषा, मंगळरेषा, अंतरज्ञानरेषा, विवाहरेषा या सर्वांचा अभ्यास केला जातो. काही व्यक्ती मेहनत करूनही हालाखीचं जीवन जगतात. पण लग्नानंतर भाग्य उजळतं आणि पैसाच पैसा येतो. लग्नानंतर झालेला हा बदल कधी कधी आश्चर्यकारक वाटतो. हातावर विवाह रेषा आणि रेषा पाहून प्रगतीबाबत भाकीत केलं जातं. विष्णुपुराणानुसार हे शास्त्र लक्ष्मीनं विष्णुला सांगितलं आणि समुद्र देवतेनं ऐकून त्याचा प्रचार केला.
हस्तरेषा शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची भाग्यरेषा हाताच्या सुरुवातीपासून सुरू होते आणि मधल्या बोटापर्यंत जाते. भाग्यरेषा मणिबंध रेषेपासून सुरू होऊन मधल्या बोटापर्यंत जाते, ही रेषा खूप शुभ मानली जाते. एखाद्याची भाग्यरेषा मणिबंधा रेषेपासून थेट शनि पर्वतावर पोहोचली असेल तर ती व्यक्ती शुभ मानली जाते. मधल्या बोटाच्या तळाशी असलेल्या भागाला शनि पर्वत म्हणतात. ज्या लोकांच्या हातात अशा रेषा असतात, त्यांना अनेक ठिकाणाहून पैसे मिळतात. त्यामुळे लग्नानंतर त्यांचे नशीब चमकू लागते.
Surya Grahan: दिवाळीतलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार, 'या' राशींसाठी ठरेल अशुभ, जाणून घ्या सूतककाळ
हस्तरेषा शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, जर एखाद्याची भाग्यरेषा चंद्र पर्वतावरून उगम पावत असेल तर त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. परंतु त्यांच्या लग्नानंतर नशिबाची साथ मिळते. त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरतो. लग्नानंतर अशी व्यक्ती विलासी जीवन जगतात. त्यांच्या आयुष्यात पुढे त्यांना कोणतीही आर्थिक अडचण येत नाही. यासोबतच हे लोक आयुष्यात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग शोधतात.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)