Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो. वर्ष 2023 मध्ये राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह गोचर करणार आहेत. राहु ग्रह मीन राशीत 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी प्रवेश करेल. खऱ्या अर्थाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी स्थित होईल. तर केतु 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी स्थित होईल. हे दोन्ही ग्रह एका राशीत दीड वर्षे ठाण मांडून असतात. म्हणून 2024 या वर्षात दोन्ही ग्रह आपलं स्थान बदलणार नाही. त्यानंतर थेट 18 मे 2025 रोजी गोचर करतील.
राहु गोचर चार राशींना अशुभ फळ देईल. या जातकांना राहुची स्थिती त्रासदायक ठरु शकते. आर्थिक हानी या काळात होऊ शकते. शारीरिक तसेच मानसिक त्रास या काळात होऊ शकतो. गुंतवणूक फलदायी ठरणार नाही. तसेच हा काळ अडचणीचा ठरणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी राहु ग्रहाने गोचर करता मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना अडचणीचा जाईल. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण चार राशींना फायदा होणार आहे.
बातमी वाचा- Mangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)