Shattila Ekadashi 2024 : हिंदू धर्मानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला षटतीला एकादशी असं संबोधलं जातं. यादिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी तीळ घालून भगवान विष्णूची पूजा केल्या मोक्ष प्राप्त होत असं म्हणतात. यादिवशी तिळाचा उपाय म्हणजे सोनं दान करण्यासारखं पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. त्यामुळे जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (shattila ekadashi 2024 february 6 ekadashi vrat shubh muhurat significance puja vidhi and Til Upay)
हिंदू पंचागानुसार षटतिला एकादशी तिथी ही 5 फेब्रुवारी संध्याकाळी 5:27 पासून 6 फेब्रुवारी संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार षटतिला एकादशी ही 6 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे.
पूजेची वेळ - सकाळी 09.51 ते दुपारी 01.57
षटतिला एकादशीचं व्रत 7 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 07.06 ते 09.18 पर्यंत तुम्ही सोडू शकता.
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाची पेस्ट लावून पाण्यात तिळ घालून आंघोळ, तिळाचे हवन, तीळ घालून तर्पण, तीळ खाणे आणि तीळाचे दान केल्याने स्वर्गप्राप्ती होतात अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूची पूजा आणि व्रताचं पालन केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात.
1. तीळ स्नान
2. तीळ उटणे
3. तीळ हवन
4. तीळ तर्पण
5. तीळ भोजन
6. तीळ दान
एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून घर स्वच्छ करा. स्नान करून देवी-देवतांचं ध्यान करणे शुभ मानले जाते. यानंतर उपवासाचा संकल्प धरावा. नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूचीही विधीवत पूजा करा. देवतेला फुलं, धूप, दिप अर्पण करा. आरती करून क्षमा प्रार्थना करुन प्रसादाचे वाटप करा. या दिवशी गरीबांना अन्नदान करा आणि दुसऱ्या दिवशी व्रत सोडा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)