सैफच्या उपचारांवर 36 लाखांचा खर्च; 25 लाख कॅशलेस मिळाल्याचं पाहून डॉक्टर म्हणाले, 'मध्यमवर्गीयांना...'

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर उपचारांसाठी आला 36 लाखांचा खर्च; तर मध्यमवर्गीयांसाठी डॉक्टर म्हणाले...

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2025, 10:23 AM IST
सैफच्या उपचारांवर 36 लाखांचा खर्च; 25 लाख कॅशलेस मिळाल्याचं पाहून डॉक्टर म्हणाले, 'मध्यमवर्गीयांना...' title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan Attack : 15 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी हल्ला झाला. त्या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. तिथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि सध्या त्याच्या तब्येतीत सुधारणा असल्याचं म्हटलं जातं आहे. असं असताना सोशल मीडियावर त्याच्या मेडिक्लेमला घेऊन वाद सुरु आहेत. खरंतर, त्याच्या मेडिकल संबंधीत माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

त्यामुळे एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात येत आहे की सैफच्या उपचारासाठी आतापर्यंत 36 लाख रुपये खर्च झाला आहे. या सगळ्यात एका डॉक्टरांनी हेल्थ इंशोरन्स कंपनी आणि मिडिल क्लासला घेऊन असं काही वक्तव्य केलं. ज्याची चर्चा रंगली आहे. डॉक्टरांनी म्हटलं की इतकी मोठी रक्कम कोणत्याही हेल्थ इंशोरंस कंपनीकडून सर्वसामान्य माणसाला दिली जाणार नाही. मुंबईच्या कार्डियक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रानं नुकतंच एक ट्वीट केला ज्यामुळे ही चर्चा रंगली आहे. 

त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं की 'सर्वसामान्य अर्थात मिडल क्लास पॉलिसी असणाऱ्याला या कंपन्या इतकी मोठी रक्कम कधीच मंजूर करणार आहे. त्यांनी म्हटलं की निवा बूपा सारख्या कंपन्या सर्वसामान्य लोकांना उपचार करण्यासाठी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देत नाही. डॉ. मिश्रानं ट्विटरवर लिहिलं की छोट्या रुग्णालयात आणि सर्वसामान्यांसाठी निवा बूपा 5 लाखा पेक्षा जास्त रक्कम मंजूर करत नाहीत. 5 स्टार रुग्णालयात खूप जास्त फी घेतात आणि विमा कंपनी ही रक्कम देखील देतात. त्याचं कारण म्हणजे प्रीमियम वाढत आहेत आणि मध्यम वर्गीय लोकं याला कंटाळले आहेत.' दरम्यान, या शस्त्रक्रियेत 35 लाख 98 हजार रुपये लागले त्यापैकी 25 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. 
 

Saif Ali Khan Attack Doctor Highlighted Struggles of Middle Class as Actor Claims Rs 36 Lakh from Mediclaim

हेही वाचा : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट

दरम्यान, या सगळ्यात पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई झोन 9 चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, 'आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. तो दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसला होता. त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.' तो मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे.