Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 2, 2023, 09:58 AM IST
Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर  7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा  title=
Shukra gochar and shukra vakri golden days these zodiac signs will shower money luxury like king

Venus Retrograde : भौतिक सुख सुविधांचा कारक शुक्र ग्रह जुलै महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. 7 जुलैला शुक्र (Shukra Gochar) सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह राशीच्या स्वामी आहे, त्यामुळे शुक्र गोचरमुळे (Shukra Rashi Parivartan) काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सावधान राहावं लागणार आहे. दुसरीकडे याच महिन्याच्या 22 जुलैला शुक्र प्रतिगामी (Shukra Vskri) होणार आहे. शुक्र कर्क राशीत त्याच्या प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल याचा सकारात्मक परिणाम 7 ऑगस्टपर्यंत दिसून येणार आहे . याचा परिणाम खास करुन तीन राशींवर दिसून येणार आहे. या तीन राशींच्या आयुष्यात (Astrology News) धन आणि प्रगतीचे योग सुरु होणार आहे.  (Shukra gochar and shukra vakri golden days these zodiac signs will shower money luxury like king)

शुक्र गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर लाभदायक ठरणार आहे. या लोकांना धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात कामाचं कौतुक होणार असून तुमचं प्रमोशनचे संकेत आहेत. या काळात तुम्ही महागडी वस्तू खरेदी कराल. व्यवसायीकांसाठी हा काळ फायदेशीर असणार आहे. 

सिंह (Leo)

शुक्र गोचर या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यांना नशिबाची साथ मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. विवाह इच्छु लोकांना लग्नाची मागणी येणार आहे. 

तूळ (Libra)

शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांचे नशीब फडफडणार आहे. करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. या दिवसात तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे. आर्थिक लाभासोबत नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला गवसणार आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. 

कुंभ (Aquarius)

शुक्र गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तुमच्या स्वभाव आणि बोलण्याच्या जोरावर तुम्ही सहज कोणाचं मनं जिंकू शकणार आहात. तुमच्या तिजोरीवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. शिवाय उत्पन्नवाढीचे नवीन मार्ग मिळणार आहेत. परदेशवारीचे योग आहेत. 

शुक्र वक्रीमुळे 'या' राशी होणार मालामाल

मेष (Aries)

शुक्र वक्री ही मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. तुमच्या आयुष्यात विलास वाढणार आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करणार आहात. वाहन किंवा घरातील वस्तू खरेदी करु शकता. व्यावसायिकांना हा काळ लाभदायक असणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होईल. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालविणार आहात. 

मिथुन (Gemini)

शुक्र वक्री या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. धनलाभासोबत प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या सुखासाठी महत्त्वाचा निर्णय घ्याल. व्यावसायिकांनी उधार दिलेले पैस परत मिळणार आहेत. 

तूळ (Libra)

शुक्र वक्री ही तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. करिअरमध्ये चागंले बदल घडणार आहेत. मनासारखं प्रमोशन आणि पगारावाढ होणार आहे. धनलाभामुळे बँक बॅलेन्स वाढणार आहे. लव्ह लाइफमध्ये आनंद असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)