Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?

Sarva Pitru Amavasya 2024 : भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. मात्र सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असल्याने पितरांना नैवेद्य दाखवायचा की नाही असा संभ्रम लोकांमध्ये आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2024, 04:14 PM IST
Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?  title=
Solar Eclipse on Sarva Pitru Amavasya 2024 ancestors accept shradh tarpan astrology in marathi

Solar Eclipse on Sarva Pitru Amavasya 2024 : पितृ पक्ष पंधरवड्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. यादिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्यात येतं. त्यासोबत घरातील पूर्वजांसाठी नैवेद्य करण्यात येतो. पण यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असल्यामुळे पितरांना नैवेद्य दाखवायचा की नाही?, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे अशुभ मानलं जातं. ग्रहण काळात अनेक गोष्टी वर्ज्य असतात. (Solar Eclipse on Sarva Pitru Amavasya 2024 ancestors accept shradh tarpan astrology in marathi)

या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला असणार आहे. भारतीय वेळेनुसार, वर्षातील दुसरं सूर्यग्रहण रात्री 9.13 वाजेपासून मध्यरात्री 3.17 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातही दिसणार नाही. यामुळे, सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला पितरांना नैवेद्य (पान, वाडी) तुम्ही करु शकता. महत्त्वाचं म्हणजे सूर्यग्रहण हे रात्री 9.30 वाजता लागणार असल्याने तुम्ही श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण सकाळी करु शकता. 

हेसुद्धा वाचा - Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! 'या' उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार

सर्व पितृ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग 

पंचांगानुसार, सर्व पितृ अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.39 वाजता सुरू होईल आणि 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.18 वाजता समाप्त होईल. तसंच 2 ऑक्टोबर रोजी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. 2 ऑक्टोबरच्या रात्री 9:13 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल आणि 3 ऑक्टोबरच्या पहाटे 3:17 वाजता समाप्त होईल. 

हेसुद्धा वाचा - Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण; जाणून घ्या सुतक काळात काय करावं आणि काय करू नये?

कन्या राशीत होणारे सूर्यग्रहण 

हे सूर्यग्रहण हस्त नक्षत्र आणि कन्या राशीत होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचे शुभ-अशुभ परिणाम सर्व राशींवर होतील. त्यामुळे सूर्यग्रहणानंतर स्नान, दान इत्यादी तुम्ही करु शकता.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)