मेष - दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतरांवर तुमचा प्रभाव राहिल. सतत विचारात रहाल. कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतीत कराल. वरिष्ठांकडून सल्ला घ्या. सकारात्मक विचार करा.
वृषभ - काम धिम्या गतीने आणि विचारपूर्वक करा. यश मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. आज मोठा घेवू शकता. वैवाहिक जीवन चांगले असेल.
मिथुन - जीवनात काय महत्त्वाचे आहे याकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. कामात यश मिळेलव्यापाराच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल.
कर्क - फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. धिम्या गतीने काम करा. चांगले राहिल. व्यापार आणि नोकरीत यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह - कोणत्याही कामात आज पुढाकार घेवू नका. इतरांचे अनुकरण करा. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. तुमचं वर्चस्व कायम राहिल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल
कन्या - महत्वाकांक्षी राहाल. जवळच्या लोकांची मदत होईल. प्रवासाचा योग आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. चांगले अनुभव येतील. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा.
तुळ - जीवनाप्रती एक नवा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो. मागच्या गोष्टी विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. दिवस चांगला आहे. स्वत:वर जास्त लक्ष द्या. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल.
वृश्चिक - दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. काही लोकांना तुमच्याबाबत द्वेष वाटू शकतो. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.
धनु - परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. तुमचे लक्ष कोणत्या दुसऱ्या स्थानी जास्त असेल. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल.
मकर - आज चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नका. शांत रहा. जास्त विचार करू नका. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी अनेक योजना मनात सुरु राहतील. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. नवीन नोकरीची संधी आहे.
कुंभ- पूर्ण लक्ष फक्त कामावर केंद्रीत करा. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. प्रसन्न राहाल. सर्वांसोबत प्रेमपूर्ण व्यवहार राहील. जवळपासच्या लोकांची मदत मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.
मीन- कामाची रुपरेषा आखल्यास कामं पूर्ण होण्यास मदत होईल. कामात गती मिळेल. आत्मविश्वास डळमळू देऊ नका. स्वत:साठी वेळ काढा. आरोग्य सुधारेल.