Astrology: सूर्यदेव मिथुन राशीत करणार प्रवेश, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशी बदल करत असतो. ग्रहांचा राशी बदल काही लोकांसाठी शुभ, तर राशींसाठी अशुभ ठरतो.

Updated: Jun 4, 2022, 08:23 PM IST
Astrology: सूर्यदेव मिथुन राशीत करणार प्रवेश, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या title=

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार मानवी जीवनावर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. त्यामुळे ग्रहांची कुंडलीतील स्थिती आणि गोचर यांचा प्रभाव व्यक्तींवर पडत असतो. एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशी बदल करत असतो. ग्रहांचा राशी बदल काही लोकांसाठी शुभ, तर राशींसाठी अशुभ ठरतो. आता प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य ग्रह 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन ही बुध ग्रहाची स्वराशी आहे. 

मेष : प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. वाणीत गोडवा राहील. मुलाच्या आरोग्याची चिंता असू शकते.

वृषभ : व्यवसायाची स्थिती सुधारेल, त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात अशांततेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आरोग्याबाबत सतर्क राहावे लागेल.

मिथुन : सूर्याचा हा राशी बदल तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मनात निराशा पसरेल पण संयम बाळगावा लागेल. बोलण्यात सौम्यता ठेवा. अडकलेले पैसे कुठून तरी परत मिळू शकतात.

कर्क : या संक्रमण काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बर्‍याच दिवसांनी मित्र आणि ओळखीचे लोक भेटू शकतात, ज्यामुळे मनात सकारात्मक उर्जा संचारेल.

सिंह : तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात रस घ्याल. कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला मनःशांती लाभेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत चांगलं वर्तन ठेवावे लागेल.

कन्या : व्यवसायात नवीन गुंतवणूक होऊ शकते. नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. संतानसुख मिळू शकेल. कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात. घराची आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ : या संक्रमणादरम्यान कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला संयम बाळगावा लागेल आणि अनावश्यक वाद टाळावे लागतील. घरात मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि तुमचा आत्मविश्वासही डळमळीत होऊ शकतो. कुटुंबासोबत धार्मिक प्रवासाचे योग होऊ शकतात. नवीन ठिकाणाहून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : नोकरीत दुसऱ्या ठिकाणी किंवा शहरात बदली होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मनात राग आणि निराशेचा संचार होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि वाईट वेळ काढावा लागेल.

धनु : सूर्य देवाच्या या राशी परिवर्तनाच्या काळात कपडे आणि इतर सामान खरेदीकडे कल वाढू शकतो. लेखन आणि इतर बौद्धिक कार्यात तुमची आवड वाढेल, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन रस्ते खुले होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे.

मकर : या संक्रमण काळात कुटुंबातील धार्मिक कार्य पूर्ण होण्याची शक्यता राहील. तुम्हाला कामात यश मिळेल, यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीलाही जाऊ शकता. राग आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ : नोकरी, परीक्षा, मुलाखत इत्यादींमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील. पालकांचे सहकार्य मिळेल. वाचनाची आवड निर्माण होईल. खाण्यापिण्यात तुमची रुची वाढेल.

मीन : नोकरीत बदलाच्या संधी मिळू शकतात. पण दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. संभाषणात संयम ठेवा आणि तणाव टाळा. या संक्रमणा दरम्यान तुम्ही वाहन खरेदी करू शकता. राग आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवावे लागेल. शांत राहा आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )