मुंबई : अनेकदा लोक हातात, पायात, गळ्यात किंवा शरीराच्या अन्य भागात काळे धागा बांधताना दिसतात. काही लोक याला श्रद्धेनं घालतात. ज्यांना असा विश्वास असतो की, काळा धागा बांधल्याने त्यांच्यापासून नकारात्मकता दूर राहते. तर काही लोकं याला फक्त फॅशन म्हणून वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहितीय का? की असं करणं चुकीचं आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सगळ्याच व्यक्तींनी हातात किंवा पायात, तसेच कमरेत काळा धागा घालने चांगले नाही. कारण ग्रहांच्या दिशा आणि राशीच्या आधारावर काळा धागा बांधला जातो. त्यामुळे प्रत्येक राशींच्या लोकांनी काळा धागा घालू नये.
त्यामुळे तुम्ही देखील अशी चूक करत असाल, तर जाणून घ्या की, ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळा धागा घालणं अशुभ आहे.
असे मानले जाते की, मंगळ ग्रहावर वृश्चिक राशीचे राज्य आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळ ग्रहाला मंगल देव असेही म्हणतात. मंगळ ग्रहाचं काळ्या रंगाशी वैर आहे. या कारणास्तव, या राशीच्या लोकांना काळा धागा न घालण्याचा सल्ला दिला जातो.
वृश्चिक राशीप्रमाणे मेष राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. काळ्या रंगाने मंगळाचा राग येतो, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनीही हातात, पायात किंवा शरीरावर कुठेही काळा धागा बांधू नये. इतकेच नाही तर असे मानले जाते की, या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास जीवनातील समस्या अनेक पटींनी वाढू शकतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)