Weekly Love Horoscope : शुक्र मेष राशीत तर शनी गोचर, हा आठवडा 'या' राशींचं लव्ह लाइव्ह खूप रोमँटिक

Weekly Love Rashifal 13 March to 19 March 2023 : शुक्र मेष राशीत आला आहे. मेष राशीत राहू आधीपासून आहे, त्यामुळे शुक्र राहुच्या संयोगाने या आठवड्यात काही राशींच्या लोकांची लव्ह लाइफ खूप चांगली असणार आहे. 

Updated: Mar 12, 2023, 10:36 PM IST
Weekly Love Horoscope : शुक्र मेष राशीत तर शनी गोचर, हा आठवडा 'या' राशींचं लव्ह लाइव्ह खूप रोमँटिक title=
Weekly Love Horoscope 13 March to 19 March 2023 weekly love rashifal all zodiac signs holi 2023 week in marathi

Weekly Love Horoscope 13 March to 19 March 2023 in marathi : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. ज्योतिषशास्त्र राशीनुसार तुमचं आयुष्य कसे असेल हे सांगत. या आठवड्यात मंगळ गोचर (Mangal Gochar 2023) आणि शनी गोचर (Shani Gochar 2023) होणार आहे. ज्योतिशास्त्रात अशी मान्यता आहे की, शनी आपल्या कर्माची फळं देतो. त्यात शुक्र ग्रह मेष (Shukra Gochar 2023) राशीत आला आहे. शुक्र हा प्रेमाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या आठवड्यात तुमची लव्ह लाइफ (Love life) जबरदस्त असणार आहे. चला तर जाणून घेऊन 12 राशीच्या लोकांची लव्ह लाइक कशी असेल ते...(Weekly Love Horoscope 13 March to 19 March 2023 weekly love rashifal all zodiac signs holi 2023 week in marathi)

मेष (Aries)

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या राशीचे लव्ह लाइफला शुक्र गोचरमुळे फायदा होणार आहे. जोडप्यामधील प्रेम वाढणार आहे. तुमच्या प्रेमाला वडीलधारांची साथ मिळणार आहे. आनंदाचे वातावरण असल्याने तुम्ही पार्टीमूडमध्ये असणार आहात. 

वृषभ (Taurus)

या राशीसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असेल, आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असणार आहे. तुमचं प्रेम मजबूत होण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. मात्र या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो. 

मिथुन (Gemini)

हा आठवडा या लोकांसाठी जरा कठीण असणार आहे. लव्ह लाइफ संबंधी तुम्हाला एखादी वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात नाराजी येऊ शकते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत सहलीवर जाण्याचा विचार कराल. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी त्यांची लव्ह लाइफ आनंदी असणार आहे. या काळात तुम्ही प्रेमसंबंध मजबूत करु शकता. वडीलधारी मंडळामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि परस्पर प्रेम वाढवणार ठरणार आहे. हा आठवडा या राशीसाठी रोमँटिक असणार आहे. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आनंद आणि समृद्धी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रेम वाढविण्याची संधी मिळेल. तुमचं प्रेम मजबूत होईल. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुमच्या जीवनात प्रेमच प्रेम असणार आहे. लव्ह लाइफसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. मात्र आठवड्याचा शेवटी मनं थोडं अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुमचं लव्ह लाइफ सुखी होणार आहे. संवाद आणि विश्वासातून तुमचं प्रेम मजबूत होणार आहे. मात्र तरीही प्रेम प्रकरणांबद्दल थोडे चलबिचल होईल. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांनी प्रेम संबंधात जागृत राहवं. या आठवड्यात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. बाहेरील व्यक्तीचे हस्तक्षेप तुमच्या नात्यात होऊ देऊ नका. तुमच्या लव्ह लाइफमध्ये आनंद हवा असेल तर जोडीदारासोबत संवाद साधा. शिवाय समंजसपणाने नातं पुढे न्या. 

धनु (Sagittarius)

या राशीची लव्ह लाइफ रोमँटिक असणार आहे. त्यामुळे तुमच्या लव्ह लाइफमध्ये आनंदच आनंद असणार आहे. मात्र एखादी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करेल. जोडीदाराशी संवाद साधून मनातील ताण कमी होईल. 

मकर (Capricorn)

या आठवड्यात तुमचं जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. तुमच्या लव्ह लाइफ रोमँटिक होणार आहे. या आनंदाच्या क्षणामुळे तुमचं नातं घट्ट होणार आहे. अविवाहित लोकांना जीवनसाथी मिळणार आहेत. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमान्सने भरलेला असणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवणार आहेत. त्यामुळे तुमचं आयुष्य आनंददायी होणार आहे. कुंभ राशीसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांचं प्रेम जीवन आनंददायी आणि प्रेमाने बहरुन जाणार आहे. त्यामुळे आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवणार आहेत. रोमान्सने भरलेला हा आठवडा तुमचं जोडीदारासोबत प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)