Narak Chaturdashi 2024 : 30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? नरक चतुर्दशीचा तिथीमुळे संभ्रम, जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त

Narak Chaturdashi 2024 : धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. यादिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. पण यंदा नरक चतुर्दशी तिथीबद्दल संभ्रम आहे. मग अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 29, 2024, 03:10 PM IST
Narak Chaturdashi 2024 : 30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? नरक चतुर्दशीचा तिथीमुळे संभ्रम, जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त title=
when the first Diwali bath 30th or 31st October Narak Chaturdashi date Tithi Auspicious Time

Narak Chaturdashi 2024 : दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर वेधतात ते छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचे. यादिवशी दिवाळीची पहिला आंघोळ केली जाते. मराठी पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. 

यंदा पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर 2024 ला बुधवारी दुपारी 01:15 पासून दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजता चतुर्दशी तिथी असणार आहे. अशामध्ये नरक चतुर्दशी कधी साजरा करायची याबद्दल संभ्रम आहे. 

30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? 

उदय तिथीनुसार, नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ करायची आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान करतात. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळावर ताव मारला जातो. त्यालाच छोटी दिवाळी असं म्हटलं जातं.

अभ्यंगस्नान करण्यामागे शास्त्रीय कारणं?

दिवाळी म्हणजे थंडीच्या दिवसांना सुरुवात मानली जाते. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसंच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळे उटणं लावून अभ्यंगस्नान करण्यात येतं. आंघोळ झाल्यानंतर अंगठ्याने 'कारेटं' फोडलं जातं. शिवाय मंदिरात जाऊन देवाच दर्शन घेतलं जातं. दरम्यान गावामध्ये यादिवशी शेतकऱ्यांच्या घरात पहिलं पीक आल्यामुळे शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात.

अभ्यंगस्नानाची वेळ

अभ्यंगस्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 - सकाळी 05:28 ते 06:41 वाजेपर्यंत 

यंदा मराठी पंचांगानुसार अभ्यंगस्नानासाठी तीन दिवस आहे. पहिला दिवाळी आंघोळ ही 31ऑक्टोबर मग 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन आणि 2 नोव्हेंबर बलिप्रतिपदाला तुम्ही करु शकणार आहात. 

नरक चतुर्दशी 2024 कुठल्या देवाची पूजा करतात? 

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा करा. या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित कराव्या आणि त्यांची यथायोग्य पूजा करावी. देवांच्या समोर धूप-दिवे लावा, कुंकू तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करुन पूजा संपन्न करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)