नवी दिल्ली : आयपीएल सीझन ११ च्या प्ले ऑफ मॅचआधी एक मॅच खेळवली जाणार आहे. ही मॅच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. बीसीसीआयने या मॅचला संमती दर्शवली आहे. यामध्ये भारतीय आणि विदेशी महिला क्रिकेटर्सच्या दोन टीममध्ये टी २० चा सामना होणार आहे. या मॅचमध्ये एकूण ३० खेळाडू असतील. ज्यामध्ये २० भारतीय तर १० विदेशी खेळाडू असणार आहे. यात खेळणाऱ्या टीमच नाव आयपीएल एकादश आणि बीसीसीआय एकादश असे असणार आहे. दुपारी अडीच वाजता स्टार स्पोर्ट्सवर ही मॅच पाहता येणार आहे.
गतवर्षी वर्ल्ड कप फायनलला पोहोचल्यानंतर महिलांच्या आयपीएलची मागणी जोर धरु लागली. याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यातील टीममध्ये ७ भारतीय तर ४ विदेशी खेळाडू खेळणार आहेत. सर्व खेळाडूंना मॅच फि आणि दिवासाचा भत्ता दिला जाणार आहे. विदेशी खेळाडूंना यासाठी बिझनेस क्लास रिटर्न तिकिटही देण्यात आली आहे. महिला क्रिकेटच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असणार असल्याचे सीओए सदस्य डायना एडुल्जी यांनी सांगितले. या प्रयोगानंतर भविष्यात महिला आयपीएलचे आयोजन करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.