मुंबई : दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात एक अजब प्रकार घडला. शेवटपर्यंत जिंकण्याची इर्षा मनात ठेवून खेळाडू आऊट होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. मात्र पंजाबच्या खेळाडूनं चक्क आऊट होण्याचा निर्णय घेतला. आता त्यामध्ये त्याच्या पार्टनरने साथ दिली नाही मात्र तो आपल्या हट्टावरून मागेही हटला नाही.
प्रश्न हा आहे की खरंच त्याने हे मुद्दाम केलं का? कोण असं करतं ज्यामुळे आपल्या टीमलाच नुकसान होईल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे क्रीडा विश्वात चर्चेला उधाण आलं.
पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंजाबच्या अर्शदीप सिंहने जाणीवपूर्वक आऊट होण्याचा निर्णय घेतला. 20 व्या ओव्हरमध्ये मुस्तफिजुर रहमान बॉलिंगसाठी आला.
शेवटच्या बॉलवर अर्शदीप सिंहने शॉट खेळला आणि आऊट होण्यासाठी मुद्दाम धाव काढली. त्यावेळी वैभव अरोडाने त्याला साथ दिली नाही. त्यामुळे अर्शदीप पुन्हा क्रीझवर येण्यासाठी तयार नव्हता त्यामुळे तो आऊट होण्यासाठी मुद्दाम उशिरा क्रीझवर पोहोचला.
दिल्ली टीमवर कोरोनाचं संकट आणि तणाव असूनही त्यांनी सामना जिंकला. अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 10 धावा देऊन 2 विकेट्स काढल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.
दिल्ली टीमने तिसरा विजय नोंदवला आहे. दिल्लीच्या या विजयामुळे आता प्ले ऑफमध्ये जाण्याची उमेद वाढली आहे. या विजयामुळे दिल्ली टीम प्लेऑफपर्यंत पोहोचेल अशी सकारात्मक आशा टीममधील खेळाडू आणि चाहत्यांना आहे.
— Peep (@Peep_at_me) April 20, 2022