होबार्ट : जिंकल्यानंतर पार्टी करणं क्रिकेटपटूंना चांगलंच महागात पडलं आहे. ऐशजमध्ये जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या पार्टीच्या आनंदावर विरजण पडलं. याला कारणीभूत खेळाडूच होते. पोलिसांनी त्यांना पार्टी बंद करायला लावली.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पार्टी करणे महागात पडलं. शेवटी ऐशेज कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू पार्टी करत होते. होबार्ट हॉटेल बारमध्ये ही पार्टी सुरू होती.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया संघ जिंकल्यानंतर त्यांनी जंगी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये इंग्लंड संघाचे काही खेळाडू सहभागी झाले होते. रात्रभर ही पार्टी सुरू होती. यामध्ये दारू, गाणी आणि जोरदार गोंधळ सुरू होता. त्याच वेळी पोलिसांना या पार्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागला.
The first and last time #Hobart will host an #Ashes test… ‘Bit too loud’ .. Awesome pic.twitter.com/zdZ4dmcsf6
— Matt de Groot (@mattdegroot_) January 18, 2022
आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) पुष्टी केली आहे की ते या घटनेची चौकशी करतील. इंग्लंडने ऐशेज सीरिज 0-4 ने गमवली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून 4-0 असा अपमानास्पद पराभव झाल्यानंतर (इंग्लंड) मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड आणि त्यांच्या संघावर आधीच दबाव आहे. मध्य होबार्टमधील क्राउन प्लाझा हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील एका बारमध्ये सकाळी 6 च्या आसपास ही पार्टी केल्याचं सांगितलं जात आहे.
व्हायरल होत असलेल्या 30 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सना पोलीस कर्मचाऱ्यांनी घेरल्याचं दिसत आहे. हॉटेलमधून गोंधळ सुरू असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
पोलिसांनी या खेळाडूंना समज दिली आणि त्यानंतर सोडून दिलं. मात्र त्यांच्या गोंधळामुळे बाकींच्याना त्रास झाला. याशिवाय सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चा वेगळ्याच. आता या प्रकरणी क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. पोलिसांनी या क्रिकेटपटूंची चौकशी करून त्यांना सोडून दिलं आणि पुढे कोणतीही कारवाई होणार नाही असं सांगितलं.