मुंबई : टीम इंडियामध्ये (Team India) खांदेपालट सुरु आहे. विराटने टी 20 आणि वनडेनंतर टेस्ट टीमचीही कॅप्टन्सी सोडली. त्यामुळे रोहितला वनडे आणि टी 20 टीमच्या कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र कसोटी संघाचं कर्णधारपद (Test Team Captaincy) हे अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे ही जबाबदारी कोणाला मिळणार, याबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआयचा (Bcci) टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीसाठीचा शोध पूर्ण झालाय. (bcci will be announce test team india captain in next week selection committee likely give this responcibilty to rohit sharma)
बीसीसीआयचं ठरलं
बीसीसीआय पुढील आठवड्यात हिटमॅन रोहित शर्माला टेस्ट टीमची कॅप्टन्सी देणार आहे. बीसीसीआय या आधीच फॉर्मेटनुसार स्वतंत्र कर्णधार देण्यासाठी सकारात्मक नव्हती. त्यामुळे यावरुन स्पष्ट होतं की रोहित शर्माच टी 20, वनडेनंतर कसोटी संघाचा कर्णधार होणार. मात्र याबाबत बीसीसीआयने औपचारिक घोषणा केलेली नाही.
सर्वांची पसंती रोहितलाच
"निवड समिती, खेळाडू, प्रशिक्षक सर्वांचीच रोहितलाच टेस्ट कॅप्टन म्हणून पहिली पसंती आहे. याबाबतची औपचारिक घोषणा ही श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करतानाच होणार आहे. पुढील आठवड्यात श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीची बैठक होणार आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सलसा दिली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे बीसीसीआयच्या घोषणेकडे लागून राहिलं आहे.