एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार

ODI Cricket Rules : दुबईत आयसीसी क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाहदेखील उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल घडवणारा क्रांतीकारी प्लान बनवला आहे. सर्व संघांची सहमती मिळाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 22, 2024, 03:52 PM IST
एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार title=

ODI Cricket Rules : क्रिकेट जगतात टी20 क्रिकेटची धुम आहे. टी20 मालिका, टी20 वर्ल्ड कप आणि टी20 लीगने स्टेडिअममध्ये क्रिकेट चाहत्यांची गर्दी वाढलीय. पण टी20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट काहीसं मागे पडत चाललं आहे. पण आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) रंगत वाढवण्यासाठी आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रांतीकारी बदलाची योजना बनवली आहे. दुबईत झालेल्या आयसीसी क्रिकेट समितीच्या (ICC Cricket Committee) बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नियम बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामुळे एकदिवसीय क्रिकेट रंगतदार होणार आहे. 

आयसीसीच्या क्रिकेट,समितीत सौरभ गांगुली, महेला जयवर्धने, व्ही व्ही एस लक्ष्मण, शॉन पॉलॉक, डेनिअल व्हिटोरी, रॉजर हार्पर आणि जय शाह उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त 25 षटकापर्यंत दोन नवे चेंडू गोलंदाज वापरु शकतील असा प्रस्ताप दिला आहे. 

एकदिवीस क्रिकेटमध्ये गोलदांजांना जीवनदान
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूचा वापर फक्त पहिल्या 25 षटकापर्यंत करता येईल असा प्रस्ताव आयसीसीच्या समितीने दिला आहे. यानंतर उर्वरित 25 षटकं केवळ एकच चेंडू वापरता येईल. आताच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही एंडकडून नवी चेंडूचा वापर केला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूच्या वापराचा गोलंदाजांना फटका बसतो. फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी मिळते. आयसीसी समितीने केलेली शिफारस आयसीसीच्या सर्व सदस्या संघांच्या कर्णधारांना पाठवण्यात आली आहे. 

सर्व कर्णधारांची सहमती मिळाल्यास नव्या चेंडूचा नियम बदलण्यात येईल. जर 25 चेंडूपर्यंतच नव्या चेंडूचा वार करण्याचा नियम आला तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांनाही पर्याय मिळेल. जुन्या चेंडूवर रिव्हर्स स्विंग करता येईल तसंच  फिरकी गोलंदाजांनाही याचा फायदा होईल. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही बदलणार नियम?
नव्या चेंडूबरोबरच आयसीसी क्रिकेट समितीने पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्याची शिफारसही करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या देशांचे संघ अनेकवेळा दोन सामन्यांची कोसटी मालिका खेळतात. केवळ भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ तीन किंवा पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतात. त्यामुळे कसोची क्रिकेटला बढावा मिळत नाहीए. आयसीसी क्रिकेट समितीने नाईट टेस्ट खेळवण्याचीही शिफारस केली आहे. 

सध्या केवळ ऑस्ट्रेलिया पिंक बॉल कसोटी सामना खेळला जातो. बीसीसीआयने गेल्या दोन वर्षांपासून पिंक बॉल कसोटी सामन्याचं आयोजन केलेलं नाही. पिंक बॉल कसोटीमुळे अधिक प्रेक्षक स्टेडिअममध्ये येतील असा आयसीसी क्रिकेट समितीला विश्वास आहे.