IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे, गक्बेरहाच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये हा सामना खेळवण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) पहिला सामना आठ विकेटने जींकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकत मालिकेवर कब्जा करण्यासाठी टीम इंडियाज सज्ज झाली आहे. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाला एकदिवसीय मालिका 0-3 अशी गमवावी लागली होता. आता या मालिका पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी टीम इंडियाकडे आहे.
या खेळाडूचं पदार्पण होणार
भारतीय संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पक्त पहिल्या सामन्यापूरता उपलब्ध होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी रिंकू सिंहला (Rinku Singh) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. आता एकदिवसीय सामन्यात रिंकूचं पदार्पण निश्चित मानलं जातंय. दक्षिण आफ्रिका खेळपट्टीवर रिंकूने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. दरम्यान रजत पाटीदारसुद्धा डेब्यू करण्याच्या शर्यतीत आहे. पण रिंकूला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
टीम इंडियाचे युवा खेळाडू साई सुदर्शन, तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगल्या फॉर्मात आहेत. तर आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह हे भारताचं वेगवान त्रिकुटही चांगल्या लयीत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
युजवेंद्र चहलला मिळणार संधी?
पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप आणि आवेशच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली होती. पण मुकेश कुमारला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे गोलंदाजीत प्रयोग करायचा झाल्यास मुकेश कुमारच्या जागी बंगाल संघाचा आकाशदीपला संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीत अष्टपैलू अक्षर पटेल आणि चायनामन कुलदीप यादवला संघाबाहेर बसवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहलला बेंचवर बसूनच सामना पाहावा लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका क्विंटन डिकॉकच्या निवृत्तीनंतर सलामीवीरच्यो शोधात आहे. रस्सी वैन डर हुसेन, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर सारखे अनुभवी फलंदाजी पहिल्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरले होते.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, अर्शदीप सिंह.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द.आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग 11
रीजा हेंड्रिक्स, टोनी डी जोरजी, रस्सी वैन डर डुसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेज शम्सी.
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय रेकॉर्ड
एकूण एकदिवसीय सामने : 92
भारत विजयी : 39
दक्षिण आफ्रीका विजयी : 50
निकाल नाही : 3
भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक
19 डिसेंबर , दूसरा एकदिवसीय सामना, गक्बेरहा
21 डिसेंबर, तीसरा एकदिवसीय सामना, पार्ल
26 से 30 डिसेंबर, पहला कसोटी सामना, सेंचुरियन
3 से 7 जनवरी, दूसरा कसोटी सामना, जोहानिसबर्ग