ICC New Anthem Video : टी20 वर्ल्ड कप 2024 ला येत्या 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिज या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. त्याआधी आयसीसीने अँथम व्हिडिओ (Anthem Video) लाँच केला आहे. आयसीसीने (ICC) आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटर हा व्हिडिओ शेअर करत स्पर्धेचं बिगुल वाजवलंय. या अँथम व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड विजेते लॉर्न बाल्फ (Lorne Balfe) यांनी याची म्यूझिक कम्पोज केली आहे. ही अँथम म्यूझीक आयसीसीच्या तीनही म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्टीय सामन्याआधी वाजवली जाणार आहे.
लॉर्न बाल्फ हे चित्रपट आणि टेलिव्हिजन दुनियेतलं मोठं नाव आहे. त्यांनी मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट 1, मॉर्गन फ्रीमॅन यांनी ऐकवलेल्या लाइफ ऑन अवर प्लॅनेट, ब्लॅक एडम, लूथर: द फॉलन सन, टॉप गन: मेवरिक अँड ब्लॅक विडो' या गाजलेल्या सिनेमा आणि म्यूझिक अल्बमसाठीही काम केलं आहे.
अँथमची सुरुवात कधी होणार?
आयसीसीचं नवं अँथम 1 जून 2024 ला टेक्सासमध्ये यूएसए आणि कॅनडादरम्यान होणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपचमध्ये सलामीच्या सामन्याआधी वाजवलं जाणार आहे. या ऐतिहासिक प्रोजेक्टवर काम करताना आपल्याला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया लॉल्न बाल्फ यांनी दिलीय. हे अँथम म्हणजे खेळ भावनेचं प्रती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आयसीसीबरोबर काम करणं आणि त्यांच्यासाठी नवं अँथम तयार करणं एक शानदार अनुभव असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आयसीसी व्यक्त केला आनंद
आयसीसीने नव्या अँथमबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा प्रोजेक्ट जगासोबत शेअर करताना आम्हाला आनंद होत असल्याचं ICC इव्हेंट्सचे प्रमुख ख्रिस टेटली यांनी म्हटलं आहे. या नवीन सोनिक ब्रँडवर गेल्या काही काळापासून काम सुरु होतं. आता अंतिम अँथम तयार झालं आहे. अँथमच्या माध्यमातून लोकांच्या मनात क्रिकेट खेळाची भावना निर्माण व्हावी आणि क्रिकेट खेळाला आणखी प्रसिद्धी मिळावी हा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Presenting the all-new ICC anthem, produced by Grammy-winning composer Lorne Balfe
https://t.co/vEKSqYOQxe pic.twitter.com/XjObgoo8Im
— ICC (@ICC) May 23, 2024
टी20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक
1 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ खेळणार असून पाच संघांचे प्रत्येकी चार ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप A मध्ये भारतासह, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका संघाचा समावेश करण्यात आला आहे. वेस्टइंडिजमध्ये 2010 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. तर अमेरिकेत पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला (India vs Pakistan) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध खेळला जाणार आहे.