मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम म्हणावा तेवढा चांगला चेन्नईसाठी गेला नाही. आतापर्यंत तिन्ही सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामनाच करावा लागला आहे. आतापर्यंत एकाही सामन्यात रविंद्र जडेजाला कर्णधार म्हणून सामना जिंकवून देण्यात यश मिळालं नाही. अंबाती रायडू टीममध्ये तिन्ही सामन्यात फ्लॉप ठरला.
ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर मोईन अली उतरू शकतो. ऑलराऊंडर मोईन अली या सामन्यात काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा असे क्रमाने मधल्या फळीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. आज चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना होत आहे. हा सामना जिंकणं चेन्नईसाठी महत्त्वाचं आहे. असाच खराब फॉर्म राहिला तर प्ले ऑफमध्ये पोहोचणं कठीण होऊ शकतं.
महेंद्रसिंह धोनीनं आयपीएल सुरू होण्याआधी कर्णधारपद सोडलं. चेन्नईची धुरा रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वामध्ये चेन्नईला एकदाही विजय मिळवण्यात यश आलं नाही.
ड्वेन प्रिटोरियसला टीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने मागच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली होती. लखनऊ विरुद्ध त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. तुषार पांडेच्या जागी एडम मिल्नेला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. एडम विजयासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्याचा फायदा चेन्नईला होणार आहे.
रवींद्र जडेजा (कर्णधार), रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, महेंद्र सिंह धोनी, ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस.