CWG 2022 : Avinash Sable ची ऐतिहासिक कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सिलव्हर

अविनाश साबळेने (Avinash Sable) भारताला पहिल्यादांच कॉमनवेल्थमध्ये (CWC 2022) स्टीपलचेज (Steeplechase) या खेळात पदक मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. अविनाशने पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये हे पदक जिंकलंय. 

Updated: Aug 6, 2022, 07:59 PM IST
CWG 2022 : Avinash Sable ची ऐतिहासिक कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सिलव्हर title=

बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या राष्टकूल स्पर्धेत (CWG 2022) भारताची वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये जोरदार कामगिरी सुरु आहे. भारताचे खेळाडू शानदार कामगिरी करत पदकाची लयलूट करतायेत. अशाचत आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बीडमधील (Beed) अविनाश साबळेने (Avinash Sable) धमाका केला आहे. अविनाशने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल पटकावलंय. त्यामुळे अविनाशचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (cwc 2022 avinash sable win silver medal in mens 3000m steeplechase event with a personal best and national record timing) 

अविनाशने भारताला पहिल्यादांच कॉमनवेल्थमध्ये स्टीपलचेज या खेळात पदक मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. अविनाशने पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये हे पदक जिंकलंय. अविनाशने अंतिम सामन्यात 8:11:20 इतक्या वेळात दुसरं स्थान पटकावलं. अवघ्या काही सेकंदांसाठी अविनाशचं सुवर्ण पदक हुकलं.

अविनाशचा मोठा विजय

अविनाशचा एकूणच हा मोठा विजय ठरला आहे. गेल्या 6 कॉमनवेल्थ स्पर्धांपासून 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये केनियाचे खेळाडू हे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदत पटकावत होते. मात्र अविनाशने एका झटक्यात हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अविनाशने रौप्य पदक जिंकण्यासह आपला वैयक्तिक आणि नॅशनल रेकॉर्डही ब्रेक केला आहे.

कोण आहे अविनाश साबळे?

अविनाश बीडमधील मांडवा गावतला आहे. अविनाशचं कुटुंब हे शेतकरी आहे. अविनाशने आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदारा कामगिरी केली आहे. आपल्या कामगिरीने त्याने देशाचं नावं अनेकदा मोठं केलंय.

अविनाश माध्यमिक शिक्षण (HSC) पूर्ण केल्यानंतर तो सैन्यदलात भरती झाला. अविनाश सैन्यदलाच्या 5 व्या महार रेजिमेंटमध्ये आहे. देशाचं आणि नागरिकांचं रक्षण करतानाच त्याने दुसऱ्या बाजूला पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे अविनाशचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे.