मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचवेळी बॉलशी छेडछाड केल्यामुळे वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचं एक वर्षासाठी निलंबन झालं. तर कॅमरून बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली. निलंबनाची शिक्षा भोगत असलेला डेव्हिड वॉर्नर आता नवीन इनिंग सुरु करतो आहे. १३ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ५ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये वॉर्नर चॅनल ९ साठी कॉमेंट्री करणार आहे. १६ जूनला कार्डिफमध्ये होणाऱ्या दुसऱ्या मॅचपासून वॉर्नर कॉमेंट्री करायला सुरुवात करेल.
२८ जूनपासून सुरु होणाऱ्या कॅनडा टी-20 लीगमधून डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ मैदानात पुनरागमन करतील. या लीगमध्ये वॉर्नर विनिपेग हॉक्सकडून तर स्मिथ टोरंटो नॅशनलकडून खेळतील. वॉर्नर २८ जून ते १५ जुलैपर्यंत कॅनडामध्ये टी-20 क्रिकेट खेळेल. यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दन टेरिटरीचं प्रतिनिधीत्व करेल.