IND vs NZ : गर्लफ्रेंड गमावली...टीम इंडिया कमावली, जाणून घ्या कोण आहे 'हा' क्रिकेटपटू

एक मोठी बातमी समोर आलीये. टीम इंडियाच्या एका खेळाडूला टीममध्ये जागा मिळाली, मात्र दुसरीकडे त्याच्या गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाल्याचं समोर आलंय.

Updated: Jan 21, 2023, 11:27 AM IST
IND vs NZ : गर्लफ्रेंड गमावली...टीम इंडिया कमावली, जाणून घ्या कोण आहे 'हा' क्रिकेटपटू title=

Prithvi Shaw : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या वनडे सामन्यात 12 रन्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) रायपुरमध्ये पोहोचली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीये. टीम इंडियाच्या एका खेळाडूला टीममध्ये जागा मिळाली, मात्र दुसरीकडे त्याच्या गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाल्याचं समोर आलंय.

Prithvi Shaw च्या एक्स गर्लफ्रेंडने केला साखरपुडा

पृथ्वी शॉची दीर्घकाळानंतर टीम इंडियामध्ये एन्ट्री होताना दिसतेय. न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. अशातच पृथ्वीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पृथ्वीची एक्स गर्लफ्रेंड प्राची (Prachi Singh) ने साखरपुडा केला आहे. 2 वर्षांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.

प्राची आणि पृथ्वी या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. मात्र 2 वर्षांपूर्वी ते दोघं विभक्त झाले. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरूनही अनफॉलो केलं. मात्र आता प्राची सिंहने मधुर शर्मासोबत साखरपुडा उरकला आहे. 

पृथ्वी आता या अभिनेत्रीला करतोय डेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा ओपनर फलंदाज पृथ्वी शॉ प्राचीशी ब्रेकअप झाल्यानंतर एक्ट्रेस आणि मॉडल निधि तापड़िया (Nidhi Tapadiaa) हिला डेट करत असल्याची माहिती आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच निधी आणि पृथ्वीने त्यांचा फोटो शेअर करत 'हॅप्पी न्यू इयर' विश केलं होतं.

या सोबतच त्यांनी फोटोसोबत हृदयाचं इमोजी देखील जोडलं. ज्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या डेटींगची एकच चर्चा सुरु झाली. इतकंच नाही तर निधी आणि पृथ्वी दोघंही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसतात.

2 वर्षांनंतर पृथ्वीची टीम इंडियामध्ये एन्ट्री

पृथ्वी शॉने रणजीमध्ये आसाम विरुद्ध त्रिशतकी खेळी करत निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पृथ्वी शॉ ने 49 चौकार आणि 4 सिक्सरच्या मदतीने 383 चेंडूत 379 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर अखेर न्यूझीलंडविरूद्धच्या दौऱ्यासाठी पृथ्वी शॉच्या नावाचा विचार करण्यात आला.