IPL 2023 Playoffs: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 16 व्या हंगामाचा थरार आता अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ सुपर जायनट्स (LSG) या तीन संघांनी आधीच प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. आता क्वालिफायरच्या एका जागेसाठी 3 संघात जोरदार भिडत होत आहे. मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांपैकी एखादी टीम प्लेऑफ गाठणार असल्याच दिसतंय. मात्र, या सर्व समिकरणात एक संघ नजरेआड पडतोय तो म्हणजे राजस्थान रॉयल्स (RR).
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ देखील प्लेऑफ (IPL 2023 Playoffs) खेळू शकतो. 14 सामन्यात 7 विजयासह 14 अंक राजस्थानच्या खात्यात आहेत. तर त्यांचा रनरेट 0.148 असा आहे. राजस्थान रॉयल्स प्लेऑफ खेळण्यासाठी, दोन समीकरण जुळणं गरजेचं आहे.
मुंबई इंडियन्सचा पराभव राजस्थानला थेट प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवू शकतो. मुंबई सध्या 14 गुणांसह -0.128 रनरेटवर आहे. मुंबईचा पराभव म्हणजे मुंबई प्लेऑफ मधून बाहेर... मग उरतात दोन संघ आरसीबी आणि आरआर.
मुंबई आज हैदराबाद (MI vs SRH) विरुध्द जिंकली तर राजस्थानला बस्तान गुंडाळावा लागेल. मात्र, मुंबईचा पराभव राजस्थानचे नगाडे वाजवू शकतो.
राजस्थानला जर प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर आजच्या दुसऱ्या सामन्यात (RCB vs GT) म्हणजेच गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दारुण पराभव व्हायला हवा. RCB सध्या 0.180 रनरेटसह 14 गुणांवर आहे. बंगळुरू राजस्थानच्या गुणापेक्षा 0.032 गुणांनी पुढे आहे. त्यामुळे नुसता पराभव नाही तर काही फरकासह बंगळुरूचा पराभव राजस्थानसाठी प्लेऑफ तिकीट असेल.
वरील दोन्ही गोष्टी जुळून आल्या तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा प्लेऑफ (IPL Playoffs) गाठू शकेल. मागील वर्षी फायनल गाठणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan Royals) नशिबात प्लेऑफ तिकीट असेल का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.
दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने दणक्यात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. त्यामुळे आता चेन्नईच्या चेपॉकवर गुजरात आणि चेन्नई (GT vs CSK Qualifire 1) यांच्यात येत्या 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर 24 मे रोजी आयपीएलचा एलिमिनेटर (IPL 2023 Eleminator) सामना लखनऊ आणि चौथ्या स्थानावर पोहोचलेल्या संघासह असणार आहे.