दुबई : आयसीसीने वनडे आणि टी 20 रँकिंग (ICC Rankings)जाहीर केली आहे. वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचं दुसरं स्थान कायम राखलं आहे. तर पहिल्या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विराजमान आहे. (icc announced t2oi and odi mens rankings virat kohli 2nd and rohit sharma 3rd positon in odi batsman ranking)
आयसीसी वनडे रँकिंगच्या टॉप 3 मध्ये टीम इंडियाच्या 2 फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये दुसऱ्या स्थानी विराट तर तिसऱ्या स्थानी 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे.
रोहित आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळला नव्हता. तर विराटने याच मालिकेत 2 अर्धशतकं लगावली होती. विराटला या 2 अर्धशतकांचा फायदा हा रँकिंमध्ये झाला आहे. विराटने आफ्रिका विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये 38.66 च्या सरासरीने 116 धावा केल्या.
आयसीसीच्या रँकिंगमध्ये बाबर, विराट आणि रोहित यांच्या नावे अनुक्रमे 873, 836 आणि 801 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर वनडे बॉलिंग रँकिंगच्या टॉप 10 मध्ये जसप्रीत बुमराह हा एकटाच आहे. बुमराह वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये 7 व्या स्थानी आहे.
टी 20 रँकिंग
टी 20 फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांचा समावेश आहे. राहुल 5 व्या तर विराट 10 व्या स्थानी आहे. तर टी 20 च्या ऑलरांउंडर टॉप 10 रँकिगमध्ये टीम इंडियाचा एकही खेळाडू नाही. दरम्यान विडिंज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आज (26 जानेवारी) किंवा उद्या घोषणा होऊ शकते.
Quinton de Kock continues his rise
Massive gains for Rassie van der Dussen
England players move up in the T20I chartsHere’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings
Details https://t.co/Jxktm5FBsr pic.twitter.com/HBGUPKNHsT
— ICC (@ICC) January 26, 2022