मुंबई: कोरोनामुळे IPL 2021चे 31 सामने स्थगित करण्यात आले होते. हे उर्वरित सामने आता कधी आणि कोणत्या वेळेत घेतले जाणार यासंदर्भात 29 मे रोजी विशेष बैठक घेण्यात येणार आहे. इंग्लंडपेक्षा UAEमध्ये सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून IPLचे सामने घेण्याबाबत सध्या नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याच दरम्यान एका मोठी चर्चा सुरू आहे.
भारतातील कोव्हिडची परिस्थिती पाहता आणि IPL संपल्यानंतर टी 20 वर्ल्डकपचे सुरुवातीचे काही सामने ओमानमध्ये खेळवले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान उद्या IPLच्या उर्वरित सामन्यांसंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
क्रिकइन्फोमध्ये दिलेल्या वृत्तानुसार असे दिसून आले आहे की आयपीएलचे 31 सामने आणि टी 20 विश्वचषकातील, 45 सामने व क्वालिफायर सामन्यांसह सामने होणार आहेत. युएईच्या तीन मैदानावर इतके सामने खेळणे फार कठीण आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्डकपचे सुरुवातीचे सामने ओमान इथे खेळवले जाण्याची शक्यता आहे.
IPLचे 29 सामने झाल्यानंतर 4 मे दरम्यान बायो बबलमध्ये कोरोनानं शिरकाव केला. त्यावेळी 4 खेळाडू आणि दोन कोच कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन IPL2021चे उर्वरित 31 सामने स्थगित करण्यात आले. हे सामने पुन्हा केव्हा नियोजित करायचे यासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.