Rehmanullah Gurbaz Making Fun Of Rinku Singh : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात शुभम दुबेला रिंकू सिंहने (Rinku Singh) मोलाची साथ दिली अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रिंकू सिंहने 9 बॉलमध्ये 2 खणखणीत चौकार ठोकत 16 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे अंतिम क्षणी टीम इंडियाला मोठ्या संघर्षाची वेळ आली नाही. त्यामुळे रिंकू सिंहचं नाव सध्या प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतंय. अशातच आता सामना संपल्यानंतर रिंकू सिंगसोबत काय काय झालं पाहा...
नेमकं काय झालं?
कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ (Rinku Singh Funny Video) शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंह विमानात झोप काढत असल्याचं पहायला मिळतंय. रिंकू सिंह गाढ झोपेत असताना अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाज (Rehmanullah Gurbaz) फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची मस्करी करताना दिसतोय. रिंकूला पाहून गुरबाजला त्याची मजा घेण्याची इच्छा झाली. गुरबाज त्याच्या जवळ जातो आणि बोटाने रिंकूच्या नाकाला स्पर्श करतो. काही तरी जवळ आल्याचं जाणवल्यानंतर रिंकू अचानक दचकून जागा झाला. पहिले काही सेकंद त्याला काही सुचलं नाही. मात्र, गुरबाजला पाहून त्याला आपली चेष्ठा चालू चालू असल्याचं समजलं. त्यावेळी रिंकूला देखील हसू आलं. त्यानंतर गुरबाजने रिंकूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पाहा Video
अफगाणिस्तानसाठी सलामीवीर गुरबाजने 28 चेंडूंचा सामना करताना 23 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीनंतर अफगाणिस्तानने 158 धावा उभ्या केल्या. मागील वर्ल्ड कपमध्ये गुरबाजने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये गुरबाजला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर.
अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.