ENG vs IND | मॅचवर पाचव्या दिवशी पावसाचं संकट?

 इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना बर्मिंघम इथे खेळवण्यात येत आहे. या खेळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

Updated: Jul 5, 2022, 12:35 PM IST
ENG vs IND | मॅचवर पाचव्या दिवशी पावसाचं संकट? title=

मुंबई : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना बर्मिंघम इथे खेळवण्यात येत आहे. या खेळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज नेमकं पाऊस खो घालण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी देखील पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला होता. आजही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. तर इंग्लंडने 284 धावा केल्या आहेत. टीम इंडिया 132 धावांनी आघाडीवर होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे 378 धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवण्यात आलं. इंग्लंडला आता विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे. 

जर इंग्लंडला रोखण्यात बॉलर्सना यश आलं तर ही मोठी जमेची बाजू असणार आहे. टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-1ने आघाडीवर आहे. ह्या सामन्यावर अखेरच्या दिवशी पावसाचं सावट आहे. त्याचा परिणाम 12 टक्केच होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे. 

पाचव्या दिवशी कोण बाजी मारणार हे पाहाणं रंजक असणार आहे. टीम इंडिया कोणती स्ट्रॅटेजी वापरणार? सामना टाय होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.