Brendon McCullum on Bazball : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांच्या आक्रमक द्विशतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवता आली आहे. इंग्लंडचा कसोटी प्लॅन असलेल्या बेझबॉलची जयस्वालने हवा काढली. त्यामुळे आता इंग्लंडचा कोच ब्रँडन मॅक्कलम (Brendon McCullum) आणि कॅप्टन बेन स्टोक्सवर (Ben Stokes) टीका होताना दिसत आहे. अशातच आता ब्रँडन मॅक्कल याने चूक तर कबूल केली नाही पण एक मोठं वक्तव्य केलंय. ब्रँडन मॅक्कलम टीम इंडियाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय का? असा सवाल देखील आता विचारला जातोय.
ब्रँडन मॅक्कलम काय म्हणतो?
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दारूण पराभव झाल्याने आम्हाला नक्कीच दु:ख झालंय, मात्र, पाच सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो आक्रमक फलंदाजी करत राहील. आम्ही फासे पलटवणार आणि भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार. अनेकवेळा अपयशाचं चव चाखावी लागते. लोक टीका करण्यासाठी आणि आपलं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहेत. पण आम्ही आमच्या तंत्रावर कायम राहणार आहे, असं म्हणत ब्रँडन मॅक्कलम याने बेझबॉल क्रिकेटवर ठाम मत मांडलं आहे.
केएल राहुलची एन्ट्री?
सिरीजमधील पहिल्याच सामन्यात केएल राहुलला दुखापत झाली होती. मात्र आता केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता जर केएल राहुल चौथ्या कसोटी सामन्यात परतला तर रजत पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याचबरोबर बुमराह देखील चौथ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याला आराम देऊन पाचवा सामना खेळणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.
दरम्यान, मालिका सुरू होण्याआधी, भारताविरुद्धची मालिका बॅझबॉलची खरी कसोटी असल्याचं मत मॅक्कलम याने मांडलं होतं. तर घरच्या मैदानांवर भारतापेक्षा कोणताही संघ चांगली कामगिरी करत नाही. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असेल. आम्ही यशस्वी ठरलो तर उत्तमच, पण अपयशी ठरलो तरी आम्ही आमची खेळण्याची शैली बदलणार नाही, असंही ब्रँडन मॅक्कलम याने म्हटलं होतं.