IND vs NZ 1st test | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित

कानपूरमध्ये (Kanpur Test) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Test) यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.    

Updated: Nov 29, 2021, 04:53 PM IST
IND vs NZ 1st test | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित  title=

कानपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना अखेर ड्रा राहिला आहे. टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या काही षटकांमध्ये अवघ्या 1 विकेटची गरज होती. मात्र डेब्युटंट रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या दोघांनी केलेल्या चिवट खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाबाबत म्हणायचं झाल्यास सामना हाती आला पण तोंडी नाही लागला असंचं म्हणावं लागेल. (Ind vs Nz 1st test 5 day india vs new zealand match drawn at greean park kanpur)

टीम इंडियाने न्यूझींलडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने चौथ्या दिवसखेर 4 धावा करुन 1 विकेट गमावली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी आणखी 280 धावांची गरज होती. तर टीम इंडियाला 9 विकेट्स हव्या होत्या. 

टीम इंडियाच्या गोलंदाजांना 9 विकेट्स घेण्यात यश आले. मात्र शेवटची एक विकेट घेण्यासाठी त्यांना कठोर संघर्ष करावा लागला, पण काही विकेट मिळाली नाही. रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवले आणि सामना अनिर्णित ठेवला. रचीनने 91 चेंडूत नाबाद 18 धावांची  खेळी केली. तर अझाजने 23 बॉलमध्ये 2 धावा करत रचीनला चांगली साथ दिली. 

न्यूझीलंडकडून  टॉम लॅथमने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विनने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं.

दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 3 ते 7 डिसेंबरला करण्यात आलं आहे. या सामन्यात विराट नेतृत्व करणार आहे.