IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सीरिजच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियावर 113 धावांनी विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली असून यामुळे टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी होम ग्राउंडवर खेळलेली टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नाही तर पुणे टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसला असून यामुळे त्यांचं WTC Final गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलण्ड यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला गेला. यापूर्वी बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. पुणे टेस्टमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडची बरोबरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र टीम इंडिया या सीरिजमध्ये पुनरागमन करण्यात अयशस्वी ठरली ज्यामुळे आता न्यूझीलंडने सीरिजमध्ये 2-0 ने आघडी घेतली. न्यूझीलंड विरुद्ध दुसराही सामना गमावल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फटका बसला आहे. टीम इंडियाने बंगळुरू टेस्ट गमावली तेव्हा भारतात नंबर 1 वर असून त्याच्या विजयाची टक्केवारी ही 68.06 होती. मात्र आता दुसऱ्या टेस्टमध्येही पराभूत झाल्यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी 62.82 वर आली आहे.
हेही वाचा : VIDEO: एका क्षणात उडाला स्टंप, जडेजाच्या 'घातक चेंडू'ने निर्माण केली दहशत, फलंदाज राहिला स्तब्ध
पुणे टेस्टपूर्वी टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 7 पैकी 4 सामने जिंकण्याची आवश्यकता होती. मात्र आता पुणे टेस्ट सामना गमावल्याने आता टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 6 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत. हे सामने जिंकणं टीम इंडियासाठी सोपं ठरणार नाही. WTC मध्ये आता टीम इंडियाच्या केवळ 6 सामने शिल्लक आहेत. यापैकी 1 सामना हा न्यूझीलंड विरुद्ध तर इतर 5 सामने हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे. यातील न्यूझीलंड विरुद्ध सामना वगळला तर इतर 5 सामने हे टीम इंडियाला भारताबाहेर खेळायचे आहेत. न्यूझीलंड विरुद्ध दोन टेस्ट सामन्यात पराभूत झालेली टीम इंडिया उरलेल्या एका सामन्यात विजय मिळवू शकेल का यावर प्रश्नचिन्ह आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजपैकी तीन सामने जिंकणं हे टीम इंडियासाठी अवघड असेल. त्यामुळे टीम इंडियाचं WTC फायनल गाठण्याचं स्वप्न भंगू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सध्या नंबर 1 वर असून त्यांचा 13 टेस्ट सामन्यांपैकी 8 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाच्या खात्यात सध्या 98 पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलिया 90 पॉईंट्स सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 60 पॉईंट्स सह टेबलमध्ये तिसऱ्या आणि न्यूझीलंड सुद्धा 60 पॉईंट्स सह चौथ्या स्थानावर आहे.