India vs New Zealand 2nd Odi: भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीजचा दुसरा सामना रविवारी हेमिल्टनमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया (Team India) सध्या या सिरीजमध्ये 0-1 अशी पिछाडीवर आहे. अशामध्ये उद्याचा सामना टीम (India vs New Zealand) इंडियासाठी 'करो या मरो'च्या स्थितीचा असणार आहे. उद्याचा सामना जर टीम इंडियाने गमावला तर त्यांना सिरीजही गमवावी लागेल. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पावसाचा अडथळा होता. अशातच उद्याच्या सामन्यात देखील पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हेमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्याच्या वेळी 100 टक्के पावसाची शक्यता आहे. दोन्ही टीम्समध्ये हा सामना न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवण्यात येणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. टीम इंडियाने येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.तर न्यूझीलंडने उर्वरित ६ सामने जिंकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 15 फेब्रुवारी 1981 रोजी सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. येथे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुंडप्पा विश्वनाथच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अवघ्या 153 धावांत सर्वबाद झाला.
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.