IND vs NZ 2nd ODI : तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना न्युझीलंडने (New Zealand) 7 विकेटसने जिंकला आहे. तर दुसरा टी20 सामना उद्या 27 नोव्हेंबर 2022 रोजी हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon park) येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) 7 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक विजय मिळवला आहे? कोण कोणावर सर्वाधिक भारी पडलाय? हे जाणून घ्या.
हे ही वाचा : IND vs NZ मध्ये दुसरा टी20 सामना, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग XI
टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. टीम इंडियाने येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.तर न्यूझीलंडने उर्वरित ६ सामने जिंकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 15 फेब्रुवारी 1981 रोजी सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. येथे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुंडप्पा विश्वनाथच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अवघ्या 153 धावांत सर्वबाद झाला.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरी वनडे 14 फेब्रुवारी 2003 रोजी खेळवली गेली होती. या सामन्यात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट झाली होती. न्यूझीलंडने 29 व्या षटकात केवळ 4 गडी गमावून लक्ष्य गाठले होते.
तिसरा वनडे सामना भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 11 मार्च 2009 रोजी खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 47 षटकांत 5 गडी गमावून 270 धावा केल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतीय संघाने केवळ 23.3 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 201 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत टीम इंडियाने डकवर्थ लुईस पद्धतीने 84 धावांनी हा सामना जिंकला होता.
भारतीय संघाने 2014 ते 2020 पर्यंत येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand)आणखी चार एकदिवसीय सामने खेळले. मात्र या 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला. 22 जानेवारी 2014 रोजी झालेल्या सामन्यात किवी संघाने भारताचा 15 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर 6 दिवसांनी झालेल्या दुसर्या सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. 31 जानेवारी 2019 आणि 5 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ अनुक्रमे 8 आणि 4 गडी राखून पराभूत झाला होता.
दरम्यान अशाप्रकारे टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाने एकदा तर न्यूझीलंड 6 वेळा सामने जिंकले आहेत.त्यामुळे या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब दिसत आहे, तर न्युझीलंड टीम इंडियावर भारी पडताना दिसत आहे.
न्युझीलंडने (New Zealand) पहिला वनडे जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकून न्युझीलंड मालिका खिशात घालते की टीम इंडिया त्यांचा पहिला विजय नोंदवते हे पाहावे लागणार आहे.